सचिनोत्सव

<B> <font color=red> निरोप : </font></b> सचिनच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या

क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक असणारा सचिन तेंडुकलर आज भावूक झाला. २००वी कसोटी त्याची अखेरची होती. त्यांने आपला नैसर्गिक खेळही या कसोटीत करताना ७४ धावा कुटल्या. यामध्ये १२ फोर लगावलेत. हाच सचिन भारताने सामना जिंकल्यानंतर भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रु आलेत. प्रेक्षकांची दोन्ही हात उंचावून मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांने मैदानावर सर्वांचे आभार मानताना काही क्षण थांबला. काय बोलावे तेच समजेत नव्हते. त्याला दाटून आले....डोळ्यांच्या कडा पाणावल्या...त्यानंतर सचिन बोलला.

Nov 16, 2013, 04:08 PM IST

सचिन तेंडुलकरला द्या, खास शुभेच्छापर प्रतिक्रिया...

मुंबईचा लाडका सचिन. क्रिकेटचा देव. मास्टर. मास्टर ब्लास्टर. बॉलरचा कर्दनकाळ. अनेक विक्रम आपल्या पायाजवळ आणले. सचिनची २००वी कसोटी. तीही शेवटची. पुन्हा सचिन आपल्याला मैदानावर दिसणार नाही. त्याला निरोप देताना चाहते भावूक झाले.

Nov 16, 2013, 12:32 PM IST

टीम जिंकली...पण सचिनच्या डोळ्यात पाणी

तिसऱ्या दिवशी पहिली विकेट ख्रिस गेलची विकेट पडली त्याचवेळी वेस्ट इंडिजचा पराभव दिसून आला. त्यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी कमाल करीत विंडिजला धक्क्यावर धक्के दिले. शेवटची विकेट सामीने काढली आणि सचिन तेंडुलकरने हातात स्टंप घेऊन दोन्ही हात उंच पसरवून वानखेडेवरील त्याच्या चाहत्यांना सामोरा गेला खरा. पण सचिनच्या डोळ्यात अश्रु दाटलेच. त्यामुळे स्टेडियमवर सन्नाटा पसरला.

Nov 16, 2013, 12:08 PM IST

सचिन विश्व : एकिकडे क्रिकेटप्रेमींचा सलाम आणि दुसरीकडे निराशा

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर सेंच्युरी पाहायला न मिळाल्यानं सचिन चाहते निराशा झाले. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर ७४ रन्सवर आऊट झाला. आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये मास्टर इनिंग खेळून सचिन पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी स्टेडियममधील क्रिकेटप्रेमींनी त्याला सलाम ठोकला. त्याच्या या इनिंगमध्ये १२ फोरचा समावेश होता.

Nov 15, 2013, 02:27 PM IST

बरं का, सचिनचाही एक बॉस आहे !

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वाचा बॉस आहे. मात्र सचिनचाही एक बॉस आहे ! ऐकून आश्चर्य वाटल ना.विशेष म्हणजे सचिन आपल्या बॉसला सिक्स मारायला शिकवतो...चला तर मग पाहूयात मास्टर-ब्लास्टरचा बॉस कोण आहे ते

Nov 13, 2013, 03:09 PM IST

१६ वर्षांनंतर सचिन वानखेडेवर सेंच्युरी झळकावर का?

२४ वर्षांच्या नेत्रदीपक कारकिर्दीची अखेर म्हणजेच सचिनची निवृत्ती जाहीर झालीय. मुंबईचा सचिन त्याची अखेरची कसोटीही मुंबईत वानखेडेवर खेळणार आहे. वानखेडे स्टेडियमशी सचिनचं नातं तसं जुनं आहे. याच वानखेडे स्टेडियमवर सचिनने अनेक नेत्रदीपक खेळ केला आहे. मात्र गेली १६ वर्ष या स्टेडियमवर सचिनला एकही सेंच्युरी झळकावता आलेली नाही. त्यामुळे अखेरच्या टेस्टमध्ये वानखेडेवर सेंच्युरी झळकावर का, याची उत्सुकता आहे.

Nov 13, 2013, 08:19 AM IST

भारत वि. वेस्ट इंडिज : तिसरा दिवस

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सीरिजच्या पहिल्या टेस्टला कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरूवात झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची फेअरवेल टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकाता टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला.

Nov 6, 2013, 09:18 AM IST