संजय राऊत

'23 तारखेनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार'

23 तारखेनंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

Feb 16, 2017, 09:45 PM IST

भाजपमध्ये सैन्यभरती प्रमाणे गुंडभरती - संजय राऊत

 पोलीस किंवा सैन्य भरती होते त्याप्रमाणे भाजपमध्ये गुंड भरती होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. अशा प्रकारे गुंडांची भरती होणं हे संघ विचारांच्या विरोधात आहे. म्हणून आरएसएसचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी शिवसेनेवर मतप्रदर्शन करण्याआधी भाजपला उपदेश करावा, असा टोला संजय राऊत यांनी नागपुरात लगावला. 

Feb 15, 2017, 10:36 PM IST

'सामना'वर बंदीवर असं काही बोलले संजय राऊत

 भाजप-शिवसेनेच्या वादाचा आणखी एक सामना रंगलाय....शिवसेनेचे मुखपत्र सामनावर तीन दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपनं राज्य निवडणूक आयोगाकडे केलीय. 

Feb 15, 2017, 08:12 PM IST

फडणवीस सरकार नोटीस पीरियडवर, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

राज्यामध्ये फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जवळपास रोजच कुरबुरी सुरु आहेत.

Feb 6, 2017, 05:49 PM IST

'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन'

मनसेने युतीचा कोणाताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढलाय. राज ठाकरे यांनी स्वत: संजय राऊत यांना फोन केला होता. तसा निरोप देण्याचे सांगितले होते, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेय.

Jan 31, 2017, 07:23 PM IST

मनसेकडून युतीचा प्रस्तावच नाही - संजय राऊतांचा प्रतिदावा

शिवसेना-मनसे युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी मनसेच्या युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून अजूनही शिवसेना-मनसेत वाद सुरू आहेत. 

Jan 31, 2017, 06:25 PM IST

'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मग औकात दाखवतो'

औकातीची भाषा मुख्यमंत्री पदाला शोभत नाही. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या मग दाखवतो औकात असा पलटवार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. 

Jan 29, 2017, 08:28 PM IST

सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीवर सेनेच्या खासदारांचा बहिष्कार

३१ तारखेला संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशऩ सुरू होत आहे. उद्धव ठाकरेंनी काल युती तुटल्याची घोषणा केल्यावर पण या बैठकीला यंदा मात्र विशेष महत्व प्राप्त झालं होतं. या बैठकीत सर्वपक्षीय खासदार उपस्थित राहणं अपेक्षित होतं. त्यामुळे युती तुटल्यावर शिवसेना आणि भाजपचे खासदार प्रथमच आमने-सामने येणार होते.

Jan 27, 2017, 12:10 PM IST

'भाजपची ताकद पाहता 60 जागाही जास्त'

मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं भाजपला पुन्हा डिवचलंय.

Jan 22, 2017, 05:37 PM IST