मुंबई : राज्यातील सध्याची स्थिती पाहता राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे आणि राज्य मध्यावती निवडणुकीच्या दिशेने वाटचाल होत असे संकेत सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी झी २४ तासशी बोलताना दिले.
झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत संजय राऊत यांनी विविध प्रश्नांवर रोखठोक उत्तरं दिलीत. यात राज्य सरकार अस्थीर आहे का असे विचारले असता ते म्हणाले, सध्या राज्यात अस्थीर वातावरण आहे. त्यामुळे काय होईल हे सांगता येत नाही. अजूनही सरकार नोटीस पीरिअडवर आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या संकेतानंतर संजय राऊत यांनी हे संकेत दिले आहे.