मुंबईत महापौर निवडीबाबत भाजपच्या भूमिकेबाबत संजय राऊत म्हणतात...

मुंबई महापालिकेमध्ये महापौर निवडीतून भाजपने माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा महापौर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Updated: Mar 4, 2017, 07:08 PM IST
मुंबईत महापौर निवडीबाबत भाजपच्या भूमिकेबाबत संजय राऊत म्हणतात... title=

मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये महापौर निवडीतून भाजपने माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा महापौर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेनेचा महापौर होणार हे कदाचित भाजपला समजलं असेल. मतदान कधीही झालं असतं तरी आमचं संख्याबळ तितकं झालं असतं, असं राऊत म्हणालेत.

दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये उपलोकायुक्त नेमणार अशी घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राऊत यांनी टोला लगावला आहे. इतर महापालिकांमध्येही उपलोकायुक्ताची नियुक्ती करायला हवी. कॅबिनेटमध्ये लोकायुक्त आला तर पारदर्शकता येईल, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची जी धोरणं चुकीची आहेत त्यांच्यावर टीका करतच राहू, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.