संजय दत्त

माझी चूक झालीय, संजय दत्तची रडारडा.....

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय दत्त आज पहिल्यांदाच पत्रकारांसमोर आला, त्याने अगदी थोडक्यात पत्रकारांशी संवाद साधला.

Mar 28, 2013, 11:43 AM IST

माफीसाठी प्रयत्न करणार नाही; संजूला अश्रू अनावर

सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर आज संजय दत्त पहिल्यांदाच मीडियासमोर आला. यावेळी संवाद साधताना संजयला अश्रू अनावर झाले.

Mar 28, 2013, 11:04 AM IST

‘संजय दत्तऐवजी मला तुरुंगात टाका…’

संजय दत्त याला सुप्रीम कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर अवघं बॉलिवूड दु:खी झालंय. अनेकांनी संजयच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि आपलं दु:ख व्यक्त केलं. याच दु:खीतांमध्ये आयटम गर्ल राखी सावंतचं नाव सर्वात अगोदर घ्यावं लागेल. कारण, राखी संजयसाठी जेलमध्ये जाण्यासही तयार झालीय.

Mar 26, 2013, 04:08 PM IST

सलमान संजयला म्हणतोय `चल मेरे भाई...`?

संजयची अनेक नेत्या-अभिनेत्यांनी भेट घेतली. पण, या सगळ्यामध्ये संजयसाठी खास भेट ठरली ती अभिनेता सलमान खानची.

Mar 26, 2013, 02:32 PM IST

`संजय दत्तला माफी, मग माझ्या आईला का नाही?`

बॉम्बस्फोटाप्रकरणातील एक दोषी जैबुनिसा कादरी हिच्या मुलीनंही आपल्या आईच्या सुटकेची मागणी पुढे केलीय. संजय दत्तला माफी मिळू शकते, तर माझ्या आईला का नाही? असा सवालच तीनं केलाय.

Mar 26, 2013, 10:09 AM IST

संजय दत्त प्रकरणी शिवसेनेचा `यूटर्न`

संजय दत्त प्रकरणी शिवसेनेने यूटर्न मारला आहे. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सेनेनं संजय दत्त यांची पाठराखण केली होती.

Mar 25, 2013, 03:41 PM IST

संजयसोबत बॉलिवूडलाही सजा!

जवळपास २० वर्षांनी १९९३ बॉ़म्बस्फोट खटल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. इतर आरोपींप्रमाणेच अभिनेता संजय दत्तलाही पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलीय. त्यामुळे आता बॉलिवूड निर्मात्यांचे धाबे दणाणलेत. कारण २०१३ ते २०१५ यावर्षापर्यंत संजूबाबाच्या नावावर जवळपास १० फिल्मस होत्या.

Mar 22, 2013, 02:28 PM IST

संजय दत्तच्या मदतीसाठी राष्ट्रवादीही सरसावली

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीये. मात्र, न्यायालयाने संजय दत्तला माफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केलीये.

Mar 22, 2013, 01:54 PM IST

नायक ते खलनायक

बॉ़लीवूडच्या मुन्नाभाईला आता तुरुंगात जावं लागणार आहे..सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय...संजय दत्तने यापूर्वीच १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे..पण आता त्याला आणखी साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे...

Mar 21, 2013, 11:55 PM IST

संजय दत्तला माफ करा- काटजू

अभिनेता संजय दत्त याला १९९२ साली झालेले बॉम्बस्फोट आणि दंगली संदर्भात अवैध शस्त्र बाळगल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मात्र संजय दत्तला माफ करावे अशा आशयाचं पत्र प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी राज्यपालांना पाठवलं आहे.

Mar 21, 2013, 11:38 PM IST

संजय दत्तला मिळालेली शिक्षा योग्य आहे का?

संजय दत्तला गुन्ह्याच्या मानाने खूप मोठी शिक्षा दिली गेली असल्याचं बॉलिवूड कलाकारांचं म्हणणं आहे.तुम्हाला काय वाटतं?

Mar 21, 2013, 05:20 PM IST

१९९३ बॉम्बस्फोट : संजय दत्तला अटक आणि शिक्षा

मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्त या हात असल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याने बेकायदा शस्त्रास्त्र बाळगली होती. संजयला कधी अटक करण्यात आली ते त्याला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा घटनाक्रम.

Mar 21, 2013, 04:54 PM IST

बॉलिवूड म्हणतं `संजय दत्त गुन्हेगार नाही!`

संजय दत्तला शिक्षा सुनावल्यावर संपूर्ण बॉलिवूडला दुःख झालं आहे. ट्विटरवर बॉलिवूडने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Mar 21, 2013, 03:53 PM IST

संजय दत्त करणार पुनर्विचार याचिका दाखल

संजय दत्तला सुनावलेल्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Mar 21, 2013, 02:50 PM IST

संजय दत्त खंबीर, शिक्षा भोगेलच - संजयचे वकील

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट आणि दंगलीदरम्यान विनापरवाना शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संजयला पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Mar 21, 2013, 02:49 PM IST