www.24taas.com, मुंबई
अभिनेता संजय दत्त याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर आत्तापर्यंत यावर मौन बाळगलेल्या बीग बींनी अखेर आपलं मौनव्रत तोडलंय. ‘खूप झालं... संजयला आता एकटं सोडा’ असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय.
‘संजय दत्त याच्याविरुद्ध झालेल्या निर्णयाचा सन्मान व्हायला हवा. याविषयावर याअगोदर कित्येक वेळा मीडियात जाहीर चर्चा झालीय. पण, आता मात्र संजयला एकटं सोडण्याची वेळ आलीय. संजयला सध्या एकांत हवाय. मी त्याच्या इच्छेचाही सन्मान करतो’, असं अमिताभन म्हटलंय. मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना अमिताभ यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक जण संजयला माफी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. खुद्द अमिताभची पत्नी आणि खासदार जया बच्चन यादेखील संजयच्या माफीसाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्या महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांचीदेखील भेट घेणार आहेत.
संजय गेल्या २० वर्षांपासून शिक्षा भोगतच आहे. तो आता खूप बदललाय. त्याला एव्हढी मोठी शिक्षा मिळणं योग्य नाही. संजय दत्तची शिक्षा माफ करण्यात यावी, या मागणीसाठी अनेक नेते-अभिनेते प्रयत्नशील आहे.