हे व्हीआयपी देखील रडले होते ढसाढसा....

सुप्रीम कोर्टानं 5 वर्षांची शिक्षा दिल्यानंतर प्रथमच मीडियासमोर आलेल्या संजय दत्तचे डोळे भरून आले... आता हा त्याला खरोखर झालेला पश्चात्ताप आहे की सहानुभूती?

Updated: Mar 30, 2013, 07:06 PM IST

www.24taas.com, मुंबई
सुप्रीम कोर्टानं 5 वर्षांची शिक्षा दिल्यानंतर प्रथमच मीडियासमोर आलेल्या संजय दत्तचे डोळे भरून आले... आता हा त्याला खरोखर झालेला पश्चात्ताप आहे की सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला ड्रामा, याची चर्चा आता रंगलीये... यामुळे आठवण होते विविध प्रसंगांमध्ये अश्रू ढाळणा-या देशविदेशातल्या व्हीआयपींची.... संजय दत्तच्या अश्रूंनी आठवण करून दिलीये डोळे पाणावलेल्या व्हीआयपींची...
अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बराक ओबामा... त्यांच्या डोळ्यांत पाणी आल्याची घटना दोन वेळा घडलीये... पहिल्यांदा व्हाईट हाऊसची पायरी चढल्यानंतर आपल्या शिकागो राज्यात आले असताना त्यांचे डोळे पाणावले. दुस-यांदा कनेक्टिकट प्रांतात शाळेत झालेल्या गोळीबारानंतर त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला...

भाजपचे `लोहपुरूष` लालकृष्ण आडवाणी यांनाही अश्रू रोखणं ब-याचदा अनावर होतं... मग दोन वर्षांपूर्वी वाढदिवसाला शुभेच्छा देणा-यांशी बोलताना भावूक होणं असो की मुंबई स्फोटांवरची फिल्म बघून डोळे ओले होणं असो...

स्पोर्ट्समध्ये तर अशी अनेक उदाहरणं आहेत....
2000 साली मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर तोवरचा विश्वविजेता कॅप्टन कपिल देव हमसून हमसून रडला होता....

2007 ची आयपीएल गाजली ती हरभजनमुळे... त्यानं श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावली आणि भर मैदानात त्यानं रडारड केली...
1996चा वर्ल्डकप... कोलकात्याच्या ईडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्ध दी ग्रेट इंडियन कोलॅप्स झाला... प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केल्यानंतर ही मॅच लंकेला बहाल करण्यात आली, तेव्हा मैदान सोडताना विनोद कांबळीला आपली भावना लपवता आली नाही.
ऑस्कर पिश्टोरियसची अलिकडची घटना... आपल्या मैत्रिणीला गोळी घातल्यानंतर कोर्टात हरज केलेल्या ऑस्करच्या अश्रुंचा बांधही असाच फुटला होता...