शोध

आश्चर्य: उकडलेलं अंड पुन्हा कच्च होणार?

पहिले कोंबडी की अंडा हा वादाचाच मुद्दा आहे. पण सध्या संशोधकांनी एक नवा शोध लावला असून आता उकडलेलं अंड पुन्हा त्याच्या पूर्वास्थेत म्हणजेज कच्च करता येणार आहे. हा शोध कँसरचा इलाज जैव तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणात खाद्य उत्पादनांमध्ये फायदेशीर ठरणार आहे. 

Jan 30, 2015, 04:39 PM IST

व्हिडिओ : देव-देवतांनी लावला विमानांचा शोध?

वेद आणि पुराणांत केलेले दावे खरे की खोटे... यावर आत्तापर्यंत अनेक वाद-विवाद घडले... असाच एक मुद्दा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे, हिंदू देव-देवतांनी विमानांचा आविष्कार घडवून आणला होता किंवा नाही यावर... 

Jan 8, 2015, 02:43 PM IST

तुमच्या चिमुकल्याबद्दल काळजी असेल तर...

तुम्हाला तुमच्या चिमुकल्याबद्दल काळजी वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... कारण, लोळा-गोळा झालेला बिछाना तसंच खेळण्यासाठी दिल्या गेलेल्या सॉफ्ट वस्तुंमुळे तुमच्या चिमुकल्याचा श्वास कोंडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलंय.

Dec 3, 2014, 05:31 PM IST

भारतीय वैज्ञानिकांना सापडली हिमालयात संजीवनी बुटी?

भारतीय वैज्ञानिकांना हिमालयाच्या वरील भागात एक विशेष बुटी सापडली आहे. वैज्ञानिकांनी दावा केला हे रोप अशी औषधी आहे की जी आपल्या इम्युन सिस्टिमला रेग्युलेट करू शकते. तसेच पर्वतीय भागात आपल्या शरीराने कसा रिस्पॉन्स द्यायला हवा यासाठी मदत करते. तसेच ही बुटी आपल्याला रेडिओअक्टिव्हिटीपासून वाचविते 

Aug 26, 2014, 05:58 PM IST

उन्नावच्या सोनेरी गावात पर्यटन विकसित करणार यूपी सरकार

उन्नावचं डौडियाखेडा गाव... आठवलं का... हो तेच गाव जिथं खजिन्याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची झोपच उडाली होती. जवळपास एका महिन्याच्या मेहनतीनंतरही पुरातत्व विभागाला तिथं सोनं सापडलं नाही. मात्र आता उत्तर प्रदेश सरकार डौडियाखेडाच्या निमित्तानं खजिना जमवण्याच्या मागे लागलंय. कारण यूपी सरकार डौडियाखेडाला पर्यटन स्थळ बनवणार आहे. 

Jul 28, 2014, 08:40 AM IST

तुमच्या मेंदूत आहे ऑन-ऑफ बटन!

मनुष्याच्या मेंदूतही ऑन-ऑफ बटन असल्याचा आणि तो शोधून काढल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय.

Jul 8, 2014, 10:34 AM IST

माशांचा मेंदू मानवापेक्षाही तल्लख!

माशांना बुद्धी नसतेच, अशी अनेकांची धारणा असते... त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा जखमही समजत नाही, हा आणखी एक असाच ग्रह...

Jun 19, 2014, 07:54 AM IST

`फेसबुक`चा जास्त वापर करणाऱ्या महिला `एकाकी`

फेसबुकवर जास्तीत जास्त वेळ अॅक्टिव्ह राहणाऱ्या आणि आपल्या प्रोफाईलमध्ये अधिकाधिक माहिती देणाऱ्या महिला आपल्या जीवनात खूप एकट्या असतात.

May 30, 2014, 07:35 PM IST

इथं उन्नावचा खजिना नाही... पण तरीही सर्व काही सोन्यासाठी!

उत्तरप्रदेशताली उन्नावमध्ये सोन्याचा शोध घेण्यासाठी राबवलेली मोहिम आपण पाहिली. सोनं मिळविण्याचीही लालसा फक्त भारतातच नाही तर परदेशांमध्येही दिसून येते. गनजॉर्गो देशातील मॉगटेडो शहरापासून जवळपास १० किलोमीटर अंतरावर असलेल्या नॉबसिन गावामध्ये सोन्याच्या खाणी आहेत. लालसेपोटी हे सोनं शोधण्यासाठी इथल्या गावांमधली मुलं बेकायदेशीरपणे सुरंग खोदून सोनं शोधण्याचं काम करतायेत.

Apr 6, 2014, 03:58 PM IST

मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागला?

मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागल्याची शक्यता वाढलीय. चीनच्या उपग्रहांना दक्षिण हिंदी महासागरात एक मोठी वस्तू तरंगतांना आढळल्याच्या एक दिवसानंतरच ऑस्ट्रिलायनं आज सांगितलं की, महासागरातील लांब भागात लाकडाचा एक खोका बघितला गेलाय.

Mar 23, 2014, 03:02 PM IST

मुलगा हरवला, पण वॉटस अॅपने शोधून दिला

एका हरवलेल्या मुलाला पोलिसांनी वॉटस अॅपच्या मदतीने शोधून काढला आहे. हा मुलगा ११ वर्षांचा आहे.

Mar 6, 2014, 03:35 PM IST

धूलीकण आणि गॅसमुळे निर्माण होतोय `चमकणारा ग्रह`!

जेव्हा तुम्ही पहाटे पहाटे झोपेतून जागं होऊन गरमागरम चहाचे घुटके मारत असता तेव्हा दूर अंतराळात कुठेतरी नव्या ताऱ्यांची उत्पत्ती होत असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Jan 21, 2014, 10:53 AM IST

पाण्याच्या शोधात बिबट्याचा मृत्यू

सातारा येथील खिंडवाडीनजीक पाण्याच्या शोधासाठी निघालेल्या बिबट्याचा पुणे बेळगाव हायवेवर मोठ्या वाहनाची धडक बसल्याने मेंदूला मार लागून जागीच मृत्यू झाला.

Dec 8, 2013, 03:21 PM IST

पृथ्वीला मिळणार चंद्रावरून वीज!

पृथ्वीवरील दिवसेंदिवस ऊर्जेचा वापर वाढत आहे त्यामुळं रोजच्यारोज ऊर्जेच्या समस्या वेगानं वाढत आहे. हा ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेऊन जपानच्या एका कंपनीनं यावर तोडगा शोधूव काढला आहे. या कंपनीनं ऊर्जेच्या समस्येवर उपाय म्हणून चंद्राच्या विषुववृत्तावर ऊर्जेच्या सौर पट्टयांचा संच लावून त्यात सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून ती पृथ्वीवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Dec 3, 2013, 04:59 PM IST

डॉल्फिन’च्या नवीन प्रजातीचा शोध

‘डॉल्फिन’ मासा त्याच्या प्रेमळ, मैत्रीपूर्ण वागणूकीसाठी तसेच हुशारीसाठी प्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ‘डॉल्फिन’ हा सर्वांच्याच आकर्षणाचा आणि उत्सुकतेचा भाग ठरलाय. याच उत्सुकतेची परिणीती म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरी समुद्र किनाऱ्याजवळ हंपबैक डॉल्फिनच्या एका नवीन प्रजातीचा मासा दिसलाय.

Oct 31, 2013, 03:29 PM IST