तुमच्या चिमुकल्याबद्दल काळजी असेल तर...

तुम्हाला तुमच्या चिमुकल्याबद्दल काळजी वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... कारण, लोळा-गोळा झालेला बिछाना तसंच खेळण्यासाठी दिल्या गेलेल्या सॉफ्ट वस्तुंमुळे तुमच्या चिमुकल्याचा श्वास कोंडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलंय.

Updated: Dec 3, 2014, 05:31 PM IST
तुमच्या चिमुकल्याबद्दल काळजी असेल तर...  title=

वॉशिंग्टन : तुम्हाला तुमच्या चिमुकल्याबद्दल काळजी वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... कारण, लोळा-गोळा झालेला बिछाना तसंच खेळण्यासाठी दिल्या गेलेल्या सॉफ्ट वस्तुंमुळे तुमच्या चिमुकल्याचा श्वास कोंडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलंय.

'सेफ टू स्लीप' या शोध अभ्यासातील निष्कर्षात हा खुलासा करण्यात आलाय. अमेरिकेत जवळपास 55 टक्के लहान मुलांचा मृत्यू बिछान्यावर या पद्धतीनं झोपल्यानं झाल्याचं समोर आलंय. यामुळे, 'सडन इनफन्ट डेथ सिंड्रोम'चा धोका असतो. 

हा शोध यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी) तसंच इतर संस्थांद्वारे केला गेलाय.

या अध्ययनाचे प्रथम लेखक तसंच अमेरिकेच्या 'सीडीसी डिव्हिजन ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ'शी संबंधीत कॅरी के शेपिरो-मेंडोजा यांच्या म्हणण्यानुसार, जरी आई-वडिलांना त्यांच्या बाळांना जास्तीत जास्त सुरक्षा देण्याचा प्रयत्न असला तर ते हे लक्षात घेत नाही की गोळा झालेल्या अंथरुण, उशीर, चादरींमुळे मुलांचा श्वास कोंडण्याची शक्यता मात्र ते लक्षात घेत नाहीत. 
 
सेपिरो - मेंडोजा यांच्या म्हणण्यानुसार, मुलांसाठी सुरक्षित अंथरुण ज्यामध्ये चादर व्यवस्थित टाकलेली असेल अशाच ठिकाणी झोपवावं. याशिवाय, इतर अंथरुणं टाळावीत. 

तसंच, मुलायम वस्तू जसं खेळणी, पाळणा, चटया, लोळा-गोळा झालेली अंथरुणं झोपताना मुलांपासून दूरच ठेवावीत... हा अभ्यास 'पीडियाट्रिक्स' या मॅगझिनमध्ये प्रकाशित झालाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.