`फेसबुक`चा जास्त वापर करणाऱ्या महिला `एकाकी`

फेसबुकवर जास्तीत जास्त वेळ अॅक्टिव्ह राहणाऱ्या आणि आपल्या प्रोफाईलमध्ये अधिकाधिक माहिती देणाऱ्या महिला आपल्या जीवनात खूप एकट्या असतात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 30, 2014, 07:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाच्या एका युनिव्हर्सिटीनं फेसबुक वापरणाऱ्या महिलांसंबंधी एक रोचक शोध समोर आणलाय. या शोधकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, फेसबुकवर जास्तीत जास्त वेळ अॅक्टिव्ह राहणाऱ्या आणि आपल्या प्रोफाईलमध्ये अधिकाधिक माहिती देणाऱ्या महिला आपल्या जीवनात खूप एकट्या असतात.
‘साऊथ वेल्स’च्या चार्ल्स स्टुअर्ट युनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांनी या अध्ययनासाठी फेसबुकवर 616 महिला युजर्सचे पोस्ट, प्रोफाईल आणि त्यांच्या अपडेट स्टेटसचा अभ्यास केला.
वेबसाईट ‘सी-नेट’वर जाहीर केलेल्या या रिपोर्टनुसार, या महिला फेसबुकवर आपल्या रिलेशनशीप स्टेटस, आवड-निवड यांबाबतीत खूप दक्ष असतात... पण, त्या त्यांच्या वैयक्तिक जिवनात मात्र एकटं जीवन जगत असतात.
अहवालानुसार, ज्या महिलांना खाजगी जीवनात एकाकी वाटत असतं त्या फेसबुकवर आपली आवड-निवड, संगीत इतकंच नाही तर आपला मोबाईल नंबर आणि घरांचे पत्तेदेखील शेअर करायला संकोच करत नाहीत.
महत्त्वाचं म्हणजे, गेल्या वर्षी मिशिगन युनिव्हर्सिटीनंही असाच एक रिपोर्ट जाहीर केला होता. दिवसभरात आपल्या वेळेतील जास्तीत जास्त वेळ फेसबुकवर व्यतीत करणारे लोक आपल्या खाजगी आयुष्यात दु:खी असतात, असं यामध्ये म्हटलं गेलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.