शिवाजी महाराज

'छत्रपतींचा आशीर्वाद मागणारे सभेत एक पुतळाही ठेवत नाहीत'

शिवरायांचा आशीर्वाद मागणारे सभेत छत्रपतींचा पुतळाही ठेवत नाही, असं म्हणत बीडच्या सभेवरून उद्धव ठाकरेंनी उडवली मोदींची खिल्ली उडवलीय.

Oct 7, 2014, 04:08 PM IST

'शिवाजी महाराजांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही'

शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही. महाराजांना सुरतचा लुटारू म्हणणाऱ्या भाजपाला आज मतांसाठी महाराज दिसत आहेत, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने कांदा जीवनावश्यक करून सरकारने शेतकऱ्यांना  मारण्याच काम केले आहे, असे प्रतिपाद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  त्यांनी  नेवासे विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. 

Oct 2, 2014, 04:00 PM IST

महाराज, तुमची राजमुद्रा चुकीची छापली

महाराष्ट्र सरकारचा अजून एक अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रं या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची चुकीची राजमुद्रा छापण्यात आलीय. हे पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलंय.

Jun 10, 2014, 08:41 PM IST

शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा, याची देही याची डोळा

शिवछत्रपतींचा 341 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रायगडावर साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तारखेप्रमाणे साज-या होणारा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.

Jun 6, 2014, 08:51 PM IST

शिवाजी महाराजांच्या नाववर सरकारचा जोगवा

निवडणुका तोंडावर आल्यानं आता राज्य सरकार जागं झालंय. मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारने स्वीकारला तर दुसरीकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

Mar 4, 2014, 09:17 PM IST

महापालिकेला जेव्हा 'झोप' येते!

पुणे महापालिकेत आज एक धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार घडलाय. शिवजयंती साजरी करणाऱ्या महापालिकेनं उत्सवादरम्यान शिवाजी महाराजांऐवजी चक्क संभाजी महाराजांचाच फोटो लावला.

Feb 19, 2014, 07:05 PM IST

शिवरायांनी सुरतला नाही, औरंगजेबाला लुटलं- नरेंद्र मोदी

काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केल्याची घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली. रायगड किल्ल्यावर शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे आजचं नरेंद्र मोदींचं भाषण अराजकीय होतं. शिवप्रतिष्ठान संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तब्बल १५ हजारांहून अधिक शिवप्रेमींना गर्दी केली होती.

Jan 5, 2014, 06:20 PM IST

एका चौकात सेनेचे एक तर राष्ट्रवादीचे दुसरे शिवाजी महाराज!

ठाण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असल्यानं आता ठाण्यातलं राजकारणं पुतळ्यांभोवती फिरु लागलय.

Dec 27, 2013, 06:55 PM IST

दिवाळीचं काऊंटडाऊन सुरू... किल्ले झाले सज्ज!

दिवाळीत किल्ला बनविणे हे लहानग्यांचे आवडीचे काम... मातीत खेळत धमाल मस्ती करत दिवाळीच्या आधी किल्ले तयार व्हावेत यासाठी बालचमुची धडपड सध्या सगळीकडचं सुरु आहे. अशीच धडपत सध्या कोल्हापूर शहरातील पेठा पेठात पहायला मिळत आहे. धगधगत्या इतीहासाची साक्ष देणाऱ्या शिवरायांचे रायगड, प्रतापगड, रागंणा,पन्हाळगड असे अनेक किल्ले लवकर उभे राहावते यासाठी सगळे मावळे कामाला लागले आहेत.

Oct 31, 2013, 09:05 AM IST

ठाण्यात शिवाजी महाराजांची ओळख होण्यासाठी `शिवगौरव` महोत्सव

फेसबुक ट्विटरवर रमणा-या सध्याच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राशी ओळख व्हावी, त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी ठाण्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जीवनगौरव या संस्थेनं शिवगौरव महोत्सवाचं आयोजन केले आहे.

Oct 23, 2013, 01:10 PM IST

स्मारकांचे मारेकरी!

शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून येतं... महाराजांची कीर्ती जगात पोहोचावी, यासाठी अरबी समुद्रात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं आखली आहे.

Jul 27, 2013, 04:00 PM IST

महाराज! तुमचा राजगड खचतोय!

शिवरायांनी स्थापन केलेल्या राज्याचा गड म्हणजे, किल्ले राजगड...मात्र या राजगडाचीही इतर किल्ल्यांप्रमाणे दुरवस्था झालीय. राजगडाच्या पाल दरवाज्याच्या बाजूचा रस्ता पावसामुळे खचलाय.

Jul 4, 2013, 09:24 PM IST

शिवकालीन गढी पुन्हा करणार इतिहास जागा!

पिंपरी चिंचवडमध्ये शिवकालीन इतिहास पुन्हा जागा होणार आहे. निमित्त आहे एका गढीच्या जीर्णोद्धाराचं..... ही गढी पुन्हा इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभी राहणार आहे.

Jun 24, 2013, 09:47 PM IST

रायगडावर रंगला शिवराज्याभिषेक सोहळा!

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार होणारा 340वा शिवराज्याभीषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जोरदार वा-यापावसाची तमा न बाळगता हजारो शिवप्रेमी किल्ले रायगडावर पारंपारिक वेशभुषेत हजर होते.

Jun 21, 2013, 04:26 PM IST