'शिवाजी महाराजांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही'

शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही. महाराजांना सुरतचा लुटारू म्हणणाऱ्या भाजपाला आज मतांसाठी महाराज दिसत आहेत, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने कांदा जीवनावश्यक करून सरकारने शेतकऱ्यांना  मारण्याच काम केले आहे, असे प्रतिपाद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  त्यांनी  नेवासे विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. 

Updated: Oct 2, 2014, 04:00 PM IST
'शिवाजी महाराजांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही' title=

अहमदनगर : शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही. महाराजांना सुरतचा लुटारू म्हणणाऱ्या भाजपाला आज मतांसाठी महाराज दिसत आहेत, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने कांदा जीवनावश्यक करून सरकारने शेतकऱ्यांना  मारण्याच काम केले आहे, असे प्रतिपाद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  त्यांनी  नेवासे विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. 

मोदी सरकारचे प्रत्येक पाऊल शेतकरी विरोधी आहे. भारताच्या पंतप्रधानांनी सगळ्या राज्याकडे सारख्या दृष्टीने पाहण्याची  गरज मात्र तसे होताना दिसत नाही. केवळ त्यांना गुजरातच दिसत आहे. राज्यातील अनेक प्रकल्प हलवले जात आहेत, असे पवार म्हणालेत.

केंद्र सरकार हे शेतकरी आणि महाराष्ट्रविरोधी आहे. मुंबईचा हिरे बाजार, समुद्रकाठावरील पोलीस ट्रेनिंग सेंटर आदी प्रकल्प मोदी गुजरातमध्ये नेत आहेत, अशी टीका  शरद पवार यांनी भुसावळ आणि चाळीसगाव येथील प्रचार सभांमध्ये केली होती. नेवासे येथील सभेत याचा पवार यांनी पुनरउच्चार केला.

ज्यांना जनतेविषयी बांधिलकी नाही अशांना त्यांची जागा दाखवावी लागेल. ज्यांनी पाच वर्षे एकासोबत संसार केला आणि नंतर दुसरा संसार थाटला, हे वागणो बरे नाही असे त्यांनी भाजपला टोला लगावला. महाराष्ट्राची जपणूक व हितासाठी चांगला निर्णय घ्या, महाराष्ट्र, देशाला शक्ती देणारे राज्य आहे. राष्ट्रवादीला संधी द्या. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी चांगल्या चेहऱ्याला संधी देण्याचे आवाहन पवार यांनी केले.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.