www.24taas.com, झी मीडिया, किल्ले रायगड
शिवछत्रपतींचा 341 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रायगडावर साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तारखेप्रमाणे साज-या होणारा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.
कोल्हापुरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी सकाळी शिवप्रतिमेची पूजा केली. वेगवेगळ्या फुलांनी नटवलेल्या मेघडंबरीतल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. राजदरबारापासून जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी गडावर हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.एखाद्या विजयोत्सवात निशाण दाखवण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरु आहे. हीच परंपरा आज राज्याभिषेक सोहळ्याच्यावेळी जपली गेली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि समस्त भारत वर्षाचे स्फुर्तीस्थान असलेल्या शिवछत्रपतींच्या 341 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं आज रायगडावर जल्लोषाचं वातावरण होतं. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर वेगवेगळ्या संघटनांनी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. वेगवेगळ्या फुलांनी नटवलेल्या मेघडंबरीतल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.
शिवरायांचा राजदरबार जिथं भरत असे, त्या राजदरबारासमोरच्या मंडपात हा कार्यक्रम सुरु असताना 10 हजारांहून अधिक शिवप्रेमी तिथं उपस्थित होते. कोल्हापुरच्या छत्रपती संभाजी महाराजांचे यावेळी शाही आगमन झालं. तेव्हा तर सर्वांच्या उत्साहाला एकच उधाण आलं. संभाजी महाराजांच्या हस्ते यावेळी शिवप्रतिमेची पूजा करण्यात आली. रायगडाच्या सध्याच्या अवस्थेवर संभाजीराजांनी खंत व्यक्त केली.
याप्रसंगी शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूकही काढण्यात आली. राजदरबारापासून जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत ही मिरवणूक निघाली. एखाद्या विजयोत्सवात निशाण दाखवण्याची परंपरा यावेळीही जपली गेली.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.