बाळासाहेबांच्या अस्थीचे मिळणार सैनिकांना दर्शन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थीकलश राज्यातील जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. याची जबाबदारी संपर्क नेत्यांवर असणार आहे. गावागावांतील शिवसैनिकांना दर्शन घेता यावं यासाठी अस्थीकलश ठेवला जाणार आहे. २३ नोव्हेंबरला अस्थीकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे.
Nov 19, 2012, 04:26 PM ISTबाळासाहेबांचे स्मारक हवे शिवाजी पार्कमध्ये - जोशी
शिवाजी पार्कात बाळासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी शिवसैनिकांकडून इच्छा आहे.
Nov 19, 2012, 02:03 PM ISTराज ठाकरेंकडून शिवाजी पार्कची पाहाणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी रात्री उशिरा दादर येथील शिवाजी पार्क आणि परिसराची पाहणी केली. बाळासाहेब यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी पाहाणी केली.
Nov 18, 2012, 08:26 AM ISTबाळासाहेब गहिवरले... डोळ्यांत आलं पाणी...
मुंबई : शिवतिर्थावर सेनेचा ४७ वा दसरा मेळावा | आज पुन्हा शिवतिर्थावर वाघाची डरकाळी... व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाळासाहेबांचा शिवसैनिकांशी संवाद
Oct 24, 2012, 09:23 PM ISTबाळासाहेब ठाकरेंची तोफ आज धडाडणार
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर आज सायंकाळी धडाडणार आहे. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून साकारलेल्या ‘फटकारे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
Oct 24, 2012, 10:58 AM ISTशिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबई हायकोर्टानं सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळं सलग ४६ वर्षाची दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहणार आहे.
Oct 15, 2012, 01:59 PM ISTशिवाजी पार्कच का? भेंडीबाजार का नाही?- उद्धव
मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसर आणि निवासी भागाला हेरिटेज दर्जा देण्याप्रकरणी हेरीटेजचा दर्जा मराठी वसाहतींनाच का? असा सवाल उद्धव यांनी केला आहे. शिवाजी पार्क परिसर हेरिटेज झाल्यास त्याचा फटका या भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला बसणार आहे.
Sep 2, 2012, 11:33 AM ISTराज ठाकरेंना आणखी एक नोटीस
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टानं आणखी एक नोटीस बजावलीय. शिवाजी पार्कवर राजकीय सभा घेण्यावर कोर्टानं घातलेल्या बंदीचा अपमान केल्याप्रकरणी राज ठाकरे यांना ही नोटीस बजावण्यात आलीय.
Jul 24, 2012, 08:19 AM IST'राज ठाकरेंनी केला न्यायालयाचा अवमान'
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरुद्ध उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आलीय. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं जाहीर सभेस नकार देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल ही अवमान याचिका आहे.
Jul 14, 2012, 12:34 PM ISTराज ठाकरेंवर खटला भरणार, येणार अडचणीत?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात खटला दाखल करणार येणार आहे. अॅडव्होकेट जनरल डी. जे. खंबांटांनी यांनी राज ठाकरे यांच्यावर खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
Jun 27, 2012, 09:37 PM ISTराज ठाकरेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली
शिवाजी पार्कवर फूट फेस्टिव्हल आयोजित करण्यास परवानगी मिळावी या मागणीची मनसेची याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली.
Apr 19, 2012, 04:49 PM ISTनिकाल 'राज' विरोधी, सभा आता घेणार कधी?
शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठीची मनसेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. हायकोर्टानं मनसेला शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनसेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
Feb 9, 2012, 04:21 PM ISTराज यांना शिवाजी पार्क सभेची परवानगी नाही
शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी नाकारण्यात आली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवरच्या रस्त्यावर सभा घेणारच, असं आव्हान राज यांनी दिले आहे.
Feb 3, 2012, 08:43 PM ISTमग झक मारायला निवडणुका घेतात – राज
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी एका दिवसाची परवानगी देणार नसतील तर काय झक मारायला घ्यायच्या निवडणुका. बंद करून टाका या निवडणुका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केली. शिवाजी पार्कवर सभा घेण्याची मनसेला परवानगी नाकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
Feb 3, 2012, 07:00 PM ISTशिवसेनेतील बंडखोर
एकेकाळी शिवसेनेत बंडाला स्थान नव्हतं. पण आता शिवसेनेलाही आता बंडखोरीची लागण झाली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेनं उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचं वाटप करण्याची रणनीती आवलंबली होती. पण काही ठिकाणी बंडखोरी झालीच.
Feb 1, 2012, 10:26 PM IST