क्लास न लावताही मुलं वर्गात येईल अव्वल! फक्त फॉलो करा 'या' पॅरेंटिंग टिप्स

मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी या टिप्स फॉलो करा. पालकांसाठी अशाच काही पालकत्वाच्या टिप्स ज्यांच्या मदतीने मूल ट्यूशनशिवाय चांगला अभ्यास करु शकतात.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 29, 2024, 01:43 PM IST
क्लास न लावताही मुलं वर्गात येईल अव्वल! फक्त फॉलो करा 'या' पॅरेंटिंग टिप्स title=

Parenting Tips : हल्ली मुलांचा अभ्यास करून घेणे आणि परीक्षेची तयारी करुन घेणे हा एक पालकांसमोरचा मोठा प्रश्न असतो. पालक दोघेही वर्किंग असल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशावेळी अनेक पालक ट्यूशन म्हणजे क्लासची मदत हेतात. पण प्रत्येकालाच ट्यूशन आणि क्लासेसची मदत होईल असं देखील नसतं. 

अशावेळी पालकांनी अगदी घरच्याघरीच मुलांना शिकवून अभ्यासाची आवड निर्माण करु शकतो. क्लासशिवायही तुम्ही मुलांना अभ्यासाची गोडी लावू शकता. यासाठी पालकांनी काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे. 

टाइम टेबल बनवा

मुलाला अभ्यासासाठी एकाच वेळी अनेक कामे देऊ नका. सतत अभ्यास करून मुलाला कंटाळा येतो आणि अशा अभ्यासाचा कोणताही फायदा होत नाही. मुलासाठी एक वेळापत्रक बनवा ज्यामध्ये अभ्यासासोबत खेळ आणि इतर गोष्टींचा समावेश असेल. त्यामुळे मुले अधिक एकाग्रतेने अभ्यास करतील.

वातावरण तयार करा

मुलाला अभ्यासात रस ठेवण्यासाठी घरात वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला अभ्यास करायला लावला असेल तर त्याला टीव्ही पाहू देणे किंवा मोबाईलवर वेळ घालवणे टाळा. त्या वेळी एखादे पुस्तक किंवा मासिक वाचले तर बरे होईल. मुलांसमोर टीव्ही किंवा मोबाईल पाहिल्याने त्यांचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकते. त्यामुळे पालकांनी सुरुवातीला काही बदल करणे आवश्यक आहे. 

मुलाचे कौतुक करा

मुलाची अभ्यासात आवड निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करा. जेव्हा त्याला कोणताही धडा आठवला किंवा पाढे आढवले तर तेव्हा त्याची स्तुती करा. निकाल आल्यावर नाराज होण्याऐवजी मागच्या वेळेपेक्षा त्याने चांगली कामगिरी केली असे म्हणा. त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून मुले प्रेरित होतात. यासोबतच मुलांसोबत थोडा वेळ घालवा आणि त्यांच्या शंका दूर करण्यास मदत करा. या सर्व टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाची अभ्यासात आवड निर्माण करू शकाल आणि शिकवणीशिवाय चांगले परिणाम मिळवू शकाल.