www.24taas.com, मुंबई
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबई हायकोर्टानं सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळं सलग ४६ वर्षाची दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहणार आहे.
मेळाव्याला परवानगी देताना हायकोर्टानं दोन अटी घातल्यात. शिवसेनेला आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे. शिवाय सभास्थळी ध्वनीरोधक यंत्रणा बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या यंदाच्या दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारली होती. गेली दोन वर्षं शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं होतं. शिवाजी पार्क हा परिसर सायलेन्स झोनमध्ये येतो. त्यामुळेच दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली होती. गेल्या ४५ वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्याची परंपरा आहे.