विराट कोहली

शतकानंतर कोहलीने रचला इतिहास

 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चेन्नईमध्ये झालेल्या चौथ्या वन डे सामन्यात भारतीय सुपरस्टार आणि उपकर्णधार विराट कोहलीने एक नवा इतिहास रचला आहे. कोहलीने आठ महिन्याच्या अंतरानंतर आपला २३ वे वन डे शतक झळकावरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक बनविण्यात वेस्ट इंडिजचा क्रिस गेल, श्रीलंकाच्या तिलकरत्ने दिलशान आणि भारताच्या सौरभ गांगुली यांना मागे टाकले आहे. तसेच पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. 

Oct 23, 2015, 01:52 PM IST

विराट - अनुष्कात दुरावा, सर्व काही ठिक नाही!

बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांच्यात सध्या ठिक नाही असच दिसून येत आहे. मीडिया सूत्रांनुसार दोघांमध्ये दुरावा आल्याची वृत्त येत आहेत. सांगितले जात आहे की, अनुष्का आणि विराटमध्ये दुरावा आलाय.

Oct 23, 2015, 01:10 PM IST

विराट कोहलीने सिक्स ठोकत शतक केले आणि दाखवले बायसेप्स

कसोटी टीमचा कर्णधार विराट कोहली यांने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वन-डे सामन्यात चांगली खेळी केली. त्यांने सिक्स ठोकत शतक केले. शतकानंतर आपली काय ताकद आहे हे दाखवून दिले. त्याने हात वर करत बायसेप्स दाखवले.

Oct 23, 2015, 12:43 PM IST

विजयादशमीच्या दिवशी भारताचा महत्त्वपूर्ण 'विराट' विजय, सीरिजमध्ये २-२ची बरोबरी

विराट कोहलीनं आज गेल्या आठ महिन्यांमध्ये खेळलेल्या वनडेमधील सेंच्युरीची प्रतिक्षा संपवत जबरदस्त सेंच्युरी केली. त्यामुळंच भारतानं आज विजयादशमीच्या दिवशी मॅच जिंकून विजयाचं सोनं लुटलं. ३५ रन्सनं चौथी वनडे मॅच जिंकत भारतानं सीरिजमध्ये २-२ची बरोबरी केलीय.

Oct 22, 2015, 10:36 PM IST

विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, गांगुली, दिलशानचा रेकॉर्ड मोडला

चेन्नईतील दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या चौथ्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीनं १३८ रन्सची खेळी करत आपल्या क्रिकेट करिअरमधील २३वी सेंच्युरी झळकावली. तब्बल १२ मॅचनंतर विराटनं आपली २३वी सेंच्युरी साजरी केलीय. या सेंच्युरीबरोबरच विराटनं भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, श्रीलंकेचा सलामीवीर दिलशान आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल यांना मागे टाकलंय. त्यांची प्रतेकी २२ शतकं होती. 

Oct 22, 2015, 10:12 PM IST

अनुष्का विराटवर इतकी चिडलीय की...

स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि स्टार अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीत काही दिवसांपासून काहीतरी बिघडल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूड आणि क्रिकेट वर्तुळात सुरु आहेत.

Oct 21, 2015, 11:37 PM IST

राजकोट वनडे पराभवाची अनेक कारणं सांगितली धोनीने

 टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात १८ धावांनी पराभूत झाल्यानंतर म्हटले की २७१ धावांचे लक्ष्य प्राप्त करणे शक्य होते, पण खेळपट्टी धीमी होत गेली, त्यामुळे फलंदाजांना फटके मारणे कठीण झाले. 

Oct 19, 2015, 11:45 AM IST

धोनी - विराट एकसाथ तो क्या हो बात...

भारत - साऊथ आफ्रिका दरम्यान पाच वनडे मॅचच्या सीरिजचा तिसरी मॅच रविवारी राजकोटमध्ये खेळली जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रॅक्टीस मॅच दरम्यान धोनी आणि विराट यांच्यात चांगली ट्युनिंग दिसून आली. 

Oct 17, 2015, 06:17 PM IST

विराट नाही, अजिंक्यच तिसऱ्या स्थानावर खेळणार; धोनीचा फैसला!

भारतीय वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि उप-कॅप्टन विराट कोहली यांच्यात काहीसा बेबनाव सुरू असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्यात. या चर्चांना आता आणखी हवा मिळणार आहे. कारण आहे धोनीनं घेतलेला एक नवा निर्णय... 

Oct 16, 2015, 06:55 PM IST

... जेव्हा विराट कोहलीनं रैनाची कॅच सोडली

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान धर्मशाळा इथं शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये एक अजबच दृश्य पाहायला मिळाल. टीम इंडियाच्या इनिंगच्या वेळी सुरेश रैनानं १७व्या ओव्हर्समध्ये केगिंसो रबाडाच्या बॉलवर एक पूल शॉट मारला. बॉल रैनाच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागून फाइन लेग बाउंड्रीकडे गेले. तिथंच टीम इंडियाचं डगआउट होतं आणि तिथेच विराट कोहली कॅच पकडायला पुढे आला पण कोहलीची कॅच पकडू शकला नाही.

Oct 4, 2015, 09:17 AM IST

अपशब्द वापरणं म्हणजे आक्रमकता नव्हे, धोनीनं सुनावलं!

टेस्ट कॅप्टन विराट कोहली याच्या आक्रमकतेवर  भारताचा सीमित ओव्हर्सचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीननं बोट ठेवलंय. सोबतच, आपला अनुभवाचा सल्लाही त्यानं कोहलीला दिलाय. 

Oct 2, 2015, 01:56 PM IST

व्हिडिओ - वन डेचा कॅप्टन धोनी करतो कसोटी कॅप्टन कोहलीला बॉलिंग

वन डेचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या बॉलिंगची प्रॅक्टीस करीत आहे. तेही कसोटीचा कॅप्टन विराट कोहलीला याला बॅटिंगची प्रॅक्टीस देतो आहे. 

Sep 25, 2015, 08:30 PM IST

ट्विटरवर कोहलीनं सचिन, धोनीला टाकलं मागे

भारताच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीला रविवारी मागे टाकलं. ट्विटरवर कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या ८० लाखांहून अधिक झालीय. 

Sep 7, 2015, 02:55 PM IST

टीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकत 22 वर्षानंतर मालिका जिंकली

टीम इंडियाच्या दोन्ही शर्मांनी चांगली कामगिरी केल्याने 22 वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम टीम इंडियाने केला. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 117 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.

Sep 1, 2015, 04:32 PM IST

ईशांत शर्माची सटकली, श्रीलंका खेळाडूंशी भिडला

 भारतीय जलदगती गोलंदाज ईशांत शर्माचा तिसऱ्या टेस्टमध्ये एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. ईशांतने सिंघम स्टाइलमध्ये 'आता माझी सटकली' म्हणत श्रीलंकेच्या गोलंदाजाशी भिडला. 

Sep 1, 2015, 02:23 PM IST