www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
सिंधुदुर्गात नारायण राणेंना मदत करणार नसाल तर खड्यासारखे बाजूला करू असा इशारा उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला होता. तरीही कार्यकर्ते माघार घ्यायला तयार नाहीत. वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊ पण राणेंना मदत करणार नाही असा पवित्रा त्यांनी आता घेतलाय. सामंतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळलीय.
रत्नागिरी सिंधुदुर्गात काँग्रेस राष्ट्रवादीतला तणाव शिगेला पोहोचलाय. विशेषतः उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना खड्यासारखं दूर करण्याचा सल्ला दिल्यावर तर कार्यकर्ते जास्तच वैतागलेत. त्यांनी थेट राजीनाम्याचा इशारा दिलाय. रत्नागिरी सिंधुदुर्गात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातलं मनोमिलन होण्याचं नाव नाही. सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणेंना संपूर्ण असहकाराची भूमिका घेतलीय. त्यावर याचे महाराष्ट्रात पडसाद उमटू शकतात असा इशारा राणेंनी दिला.
पाठोपाठ उदय सामंत यांनीही आपल्याच कार्यकर्त्यांना खड्यासारखं दूर करण्याचा इशारा दिला.मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत. उदय सामंत यांच्या इशा-यानंतर कार्यकर्ते आता अधिकच नाराज झाले असून त्यांनी वेळ पडली तर थेट राजीनामा देण्याचा इशारा दिलाय.
सिंधुदुर्गात कार्यकर्ते संपूर्ण असहकार पुकारत आहेत तर रत्नागिरीतले काही नेते वगळता कार्यकर्ते राणेंसाठी कामाला लागलेले नाहीत. मात्र रत्नागिरीत राणेंसमोर कार्यकर्त्यांना इशारे देणारे उदय सामंत सिंधुदुर्गात मात्र कार्यकर्त्यांना सबुरीची भाषा घेण्याचा सल्ला देतात
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने सिंधुदुर्गात स्वतंत्र प्रचारयंत्रणा उभारलीय. मात्र हा असहकार असाच सुरू राहीला तर राणेंच्या अडचणीत वाढ होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.