अजितदादांच्या आदेशाला केराची टोपली!
पिंपरी-चिंचवडमध्ये खुद्द अजितदादांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा गाजावाजा करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली. त्यासाठी प्रत्येक शहरात युवतींच्या सदस्य नोंदणीचे आदेश देण्यात आले. पण पिंपरी-चिंचवडमध्ये थेट अजित दादांनी पत्र पाठवूनही सदस्य नोंदणी मध्ये नगरसेवक यशस्वी झालेले नाहीत.
Mar 3, 2013, 06:51 PM ISTकोल्हापूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा विजय
कोल्हापूर जिल्हयातील चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर विजयी झाल्यात. 24 हजार 848 मतांनी त्यांचा विजय झालाय.
Feb 28, 2013, 10:09 PM ISTराज 'गडी बावचळलायं' - अजित पवार
नौटंकी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाणलाय. जर कोणी असे समजत असेल तर उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे, हेही लक्षात ठेवा, असा इशारा राज यांना पवार यांनी दिला.
Feb 27, 2013, 07:00 PM ISTराम कदमांचे दारू पाजून राड्याचे आदेश - मलिक
अहमदनगरमधील मनसे आणि राष्ट्रवादीच्या राड्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करू लागलेत.
Feb 27, 2013, 12:58 PM ISTमनसे-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर काल रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणी मनसेच्या 150 तर राष्ट्रवादी काँग्रेस 80 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर दग़डफेक केल्याची पोलिसांत नोंद करण्यात आलीये.
Feb 27, 2013, 12:25 PM ISTपालिकेतील अजितदादांच्या फोटोला काळे फासले
अहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचे पडसाद मुंबईतही उमटले... आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून धुडगूस घातला.
Feb 27, 2013, 11:42 AM ISTदगडफेक ही मनसेची स्टंटबाजी – नवाब मलिक
अहमदनगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये झालेली दगडफेक मनसेनं घडवून आणल्याचा सनसनसनाटी आरोप राष्ट्रवादीनं केलाय.
Feb 27, 2013, 11:12 AM ISTमुंबईत मनसेने केलीत NCPची कार्यालये टार्गेट
अहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचे पडसाद मुंबईतही उमटले... मनसे आमदार राम कदम आणि मनसैनिकांनी मुंबईत ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसला टार्गेट केलं...
Feb 27, 2013, 10:12 AM ISTमनसेनेच गाडीतून आणले होते दगड- राष्ट्रवादी
मनसेचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किरण काळे यांनी फेटाळलेत... राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये शांततेने आंदोलन केल्याचा दावा त्यांनी केलाय.. तसंच मनसेकडूनच गाडीतून दगड आणण्यात आल्याचा आरोपही काळे यांनी केलाय...
Feb 27, 2013, 09:44 AM ISTNCPने लोकशाही मार्गाने विरोध करावा- नांदगावकर
मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी राज यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केलेत... विरोध करायचा असल्यास लोकशाही मार्गाने करा अन्यथा समोर येऊन हल्ले करा असं आव्हान त्यांनी राष्ट्रवादीला दिलंय...
Feb 27, 2013, 09:20 AM ISTराज ठाकरेंवरील हल्ल्यामुळे राज्यभऱात ‘खळ्ळ् खट्याक’!
अहमदनगरच्या भिंगार गावाजवळ राज यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.. ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मनसेनं केलाय... या दगडफेकीचे पडसाद लगेचच राज्यभर उमटण्यास सुरुवात झालीय...
Feb 27, 2013, 08:31 AM ISTराज ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक
अहमदनगर जिल्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. नगर जिल्ह्यातील भिंगार गावातील ही घटना आहे.
Feb 26, 2013, 10:51 PM ISTमहाराष्ट्राचे खासदार करणार बजेटला विरोध
महाराष्ट्रातले खासदार या रेल्वे बजेटवर नाराज आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रावादीचे खासदारही या बजेटवर संतप्त आहेत. याचसंदर्भात दिल्लीमध्ये सेंट्रल हॉलमध्ये सेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची बैठक सुरू झाली आहे.
Feb 26, 2013, 04:04 PM ISTदुष्काळावर राष्ट्रवादी काँग्रेसची बनवाबनवी
दुष्काळग्रस्तांना मदत उभारण्यासाठी राष्ट्रवादी दुष्काळग्रस्त सहायता अभियान सुरू केलंय. यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुस्तिकेत छापण्यात आलेली दुष्काळग्रस्तांची छायाचित्रे आफ्रिकेतल्या देशांमधील वापरण्यात आल्याचं उघड झालंय.
Feb 25, 2013, 11:57 PM ISTराष्ट्रवादीवर शिवसेनेचे खळबळजनक आरोप
पिंपरी- चिंचवडमध्ये मोठा गाजावाजा करत सुरु झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून राजकारण चांगलंच तापलंय. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.
Feb 25, 2013, 10:04 PM IST