कोल्हापूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा विजय

कोल्हापूर जिल्हयातील चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर विजयी झाल्यात. 24 हजार 848 मतांनी त्यांचा विजय झालाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 28, 2013, 10:09 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हयातील चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर विजयी झाल्यात. 24 हजार 848 मतांनी त्यांचा विजय झालाय.
राष्ट्रवादीचे नेते आणि नियोजन मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचं निधन झाल्यानं ही पोटनिवडणूक झाली. संध्यादेवी कुपेकर या बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी आहेत. मतमोजणीच्या सुरवातीपासुनच संध्यादेवी कुपेकर यांना आघाडी मिळाली होती. दहाव्या फेरीमध्ये संध्यादेवी कुपेकर यांना 21,595 मतांचं मताधिक्य मिळालं होतं एकुण 1 लाख 84 हजार 571 मतापैकी 93 हजार 483 मतं मिळवुन विजयी झाल्यात. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्याण्णावार आणि शिवसेनेचे उमेदवार सुनिल शिंत्रे यांचा पराभव केला.

राजेंद्र गड्याण्णावार यांना 68 हजार 638 मतं मिळाली. तर सुनिल शिंत्रे यांना 22 हजार 448 मतावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादी पक्षानं ही निवडणुक प्रतिष्टेची केली होती. त्यामुळं राज्यातील सगळेच राष्ट्रवादीचे नेते निवडणुक प्रचारात उतरले होते.