शरद पवारांच्या पोस्टरला काळे फासले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील वाद-प्रतिवाद शिगेला पोहोचला असताना खेडमध्ये शरद पवार यांच्या पोस्टरला काळे फासले. त्यामुळे खेड शहरात तणावाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनसे कार्यकर्त्यांकडे बोट दाखविले आहे.
Feb 27, 2013, 11:52 PM ISTराज ठाकरे औरंगाबादेत दाखल, चाहत्यांची प्रचंड गर्दी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थोड्या वेळापूर्वीच औरंगाबादमध्ये दाखल झाले. अहमदनगरहून निघाल्यावर त्यांनी थेट औरंगाबाद गाठलं.
Feb 27, 2013, 09:36 PM ISTमनसेच्या रेल्वे इंजिनाला दोन पेग लागतात - हर्षवर्धन जाधव
मनसेला रामराम केल्यानंतर आज आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पहिल्यांदाच जाहीर शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी राज ठाकरेंच्या मनसेवर तोंडसुख घेतले. मनसेचं रेल्वे इंजिन दोन पेग पिल्याशिवाय चालतच नाही, अशी जहरी टीका जाधव यांनी कन्नड येथे केली.
Feb 27, 2013, 07:12 PM ISTराज 'गडी बावचळलायं' - अजित पवार
नौटंकी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाणलाय. जर कोणी असे समजत असेल तर उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे, हेही लक्षात ठेवा, असा इशारा राज यांना पवार यांनी दिला.
Feb 27, 2013, 07:00 PM ISTदगडफेक झालीच, राज ठाकरेंचा पोलिसांवर आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अहमदनगर येथील बैठक काही वेळेपूर्वीच संपली. त्यानंतर राज ठाकरे काय आदेश देणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
Feb 27, 2013, 06:19 PM ISTराज ठाकरेंची बैठक सुरू, काय आदेश देणार?
अहमदनगरमध्ये राज ठाकरे मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
Feb 27, 2013, 05:01 PM ISTराज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
राज ठाकरेंच्या ताफ्यावरील दगडफेक आणि त्यानंतर मनसेनं घेतलेल्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष विरोधी पक्ष आहे.
Feb 27, 2013, 03:05 PM ISTराम कदमांचे दारू पाजून राड्याचे आदेश - मलिक
अहमदनगरमधील मनसे आणि राष्ट्रवादीच्या राड्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करू लागलेत.
Feb 27, 2013, 12:58 PM ISTमनसे-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर काल रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणी मनसेच्या 150 तर राष्ट्रवादी काँग्रेस 80 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर दग़डफेक केल्याची पोलिसांत नोंद करण्यात आलीये.
Feb 27, 2013, 12:25 PM ISTपालिकेतील अजितदादांच्या फोटोला काळे फासले
अहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचे पडसाद मुंबईतही उमटले... आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून धुडगूस घातला.
Feb 27, 2013, 11:42 AM ISTदगडफेक ही मनसेची स्टंटबाजी – नवाब मलिक
अहमदनगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये झालेली दगडफेक मनसेनं घडवून आणल्याचा सनसनसनाटी आरोप राष्ट्रवादीनं केलाय.
Feb 27, 2013, 11:12 AM ISTमुंबईत मनसेने केलीत NCPची कार्यालये टार्गेट
अहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचे पडसाद मुंबईतही उमटले... मनसे आमदार राम कदम आणि मनसैनिकांनी मुंबईत ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसला टार्गेट केलं...
Feb 27, 2013, 10:12 AM ISTमनसेनेच गाडीतून आणले होते दगड- राष्ट्रवादी
मनसेचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किरण काळे यांनी फेटाळलेत... राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये शांततेने आंदोलन केल्याचा दावा त्यांनी केलाय.. तसंच मनसेकडूनच गाडीतून दगड आणण्यात आल्याचा आरोपही काळे यांनी केलाय...
Feb 27, 2013, 09:44 AM ISTNCPने लोकशाही मार्गाने विरोध करावा- नांदगावकर
मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी राज यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केलेत... विरोध करायचा असल्यास लोकशाही मार्गाने करा अन्यथा समोर येऊन हल्ले करा असं आव्हान त्यांनी राष्ट्रवादीला दिलंय...
Feb 27, 2013, 09:20 AM ISTराज ठाकरेंवरील हल्ल्यामुळे राज्यभऱात ‘खळ्ळ् खट्याक’!
अहमदनगरच्या भिंगार गावाजवळ राज यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.. ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मनसेनं केलाय... या दगडफेकीचे पडसाद लगेचच राज्यभर उमटण्यास सुरुवात झालीय...
Feb 27, 2013, 08:31 AM IST