राज ठाकरेंच्या भेटीला रतन टाटा !
टाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा हे कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. रतन टाटा ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे.
Mar 8, 2013, 04:33 PM ISTराज ठाकरे का झाले नाराज?
शिवसेना-भाजप आणि आरपीआय या महायुतीला मनसेचं इंजिन, असे प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार आहे. हे वृत्त दिशाभूल करणारं आहे, अशी माहिती खुद्द राज ठाकरे यांनी दिलीय. यावेळी राज ठाकरे यांनी बातमी संदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
Mar 8, 2013, 12:16 PM ISTराज ठाकरेंची तातडीनं चौकशी करा - न्यायालयाचे आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्यांचा तपास वेगानं केला जावा, असे आदेश दिल्ली कोर्टानं दिलेत. राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर भारतीयांना घुसखोर असं संबोधलं होतं.
Mar 8, 2013, 10:50 AM ISTमनसेच्या चार कार्यकर्त्यांना मुंबईत अटक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अहमदनगर दौऱ्याच्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होती. याचे पडसाद मुंबईतही उमटले होते. तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये मनसेच्या विभागप्रमुखाचा समावेश आहे.
Mar 7, 2013, 01:04 PM ISTमनसेचा राष्ट्रवादी विरोध खरा की दिखावा?
राज ठाकरेंचा राज्यातला दौरा चांगलाच गाजला तो अजित पवार आणि राष्ट्रवादीवरच्या टीकेवरून.. दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे चांगलेच राजकारण रंगलं. आणि त्यातून हा वाद थेट दगडफेकीपर्यंत पोहोचला. मात्र मनसेचा राष्टवादी विरोध खरा आहे की दिखावा?
Mar 6, 2013, 06:29 PM ISTसिंचन घोटाळा : राज ठाकरेंना विनोद तावडेंचा टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी टोला लगावलाय. मनसे आमदारांना घोटाळा बाहेर काढणं जमलं तरी असतं का? सिंचन घोटाळा भारतीय जनता पक्षाने बाहेर काढलाय, असं तावडेंनी राज यांना प्रत्युत्तर केलंय.
Mar 6, 2013, 05:00 PM ISTमराठी हद्दपार : UPSCप्रकरणी राज ठाकरे गप्प का?
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC नं प्रादेशीक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय काढून टाकलाय. आयोगाच्या या निर्णया विरोधात शिवसेनेनं हुतात्माचौकात आंदोलन केलंय. मात्र, मराठीच्या मुद्यासाठी रान उठवणा-या राज ठाकरेंच्या मनसेकडून या विषयावर अद्याप पर्यंत कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.
Mar 6, 2013, 04:30 PM IST`राज ठाकरे म्हणजे संध्याकाळची एन्टरटेन्मेंट आहे`
`शेवटी संध्याकाळी दमून भागून घरी आल्यावर जेवताना, चहा पिताना... बायकोच्या शेजारी बसून चहा तिच्या हातचा घेताना काही तरी एन्टरटेनमेंट पाहिजे की नाही.’
Mar 6, 2013, 12:04 PM ISTजयंत पाटीलांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
राज ठाकरे यांची भाषणं म्हणजं संध्याकाळची एन्टरटेनमेंट आहे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी तोफ डागली आहे.
Mar 6, 2013, 10:54 AM ISTराज ठाकरेंपुढे अजित दादा शांत का?
राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या वाग्युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषतः दादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Mar 4, 2013, 07:22 PM ISTदुष्काळात `आयपीएल`वर खर्च करणं पटतं का?- राज
दुष्काळात आयपीएल मॅचेस आयोजित करण्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. त्यात आयपीएलला करमणूक करही माफ केला आहे. हे योग्य आहे का?
Mar 4, 2013, 06:08 PM ISTमला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका - राज
मी जालन्यात जाहीर केले. मात्र, पुण्यात माझी सभा नाही. तसेच पुण्यात माझा तसा काहीच कार्यक्रम नाही. पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आव्हान दिल्याने मी पुण्यात जाणार असल्याचे जाहीर केलं. कोणीतरी तरी मुर्खासारखे बोलतं, त्यामुळे मी लक्ष घातलं एव्हढच, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.
Mar 4, 2013, 06:04 PM ISTमराठी'राज'... 'माझी भूमिका मराठी माणसासाठीच...'
माझी भूमिका ही मराठी माणसांसाठीच आहे आणि त्यात अजिबात बदल होणार नाही, असं ठासून सांगत राज ठाकरेंनी एकप्रकारे आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचं समर्थनच केलंय.
Mar 4, 2013, 05:57 PM IST`माझा पुण्यात कोणताही कार्यक्रम नाही`
मनसे आणि `दादां`च्या राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक चकमकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थाची भूमिका घेतली. राज यांना अडवू नये, अशी सूचना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांनी केलीय. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतलीय. पाहुयात काय काय म्हणालेत ते या पत्रकार परिषदेत...
Mar 4, 2013, 05:37 PM IST`राज आणि अजित पवारांमधील युद्ध दुर्दैवी`
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरु असणारे युद्ध दुर्दैवी असल्याची टीका वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली. सांगलीमध्ये कदम प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Mar 3, 2013, 07:44 PM IST