राज ठाकरे योग्यवेळी उत्तर देतील- नांदगावकर
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या टीकेला मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी जोरदार उत्तर दिलंय. मनसेला नको त्या गोष्टी उघड करण्यास भाग पाडू नका असं सांगत विरोधी पक्षनेत्यांनी आजपर्यंत सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा लेखाजोखा द्यावा असं आव्हान दिलंय.
Mar 11, 2013, 06:22 PM IST`राज ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात`
राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडल्यावर आता त्यांच्या विरोधकांनीही राज ठाकरेंविरोधात तोफ डागली आहे. शिवसेनेने मनसेवरून भाजपाला टोला दिला आहे.
Mar 11, 2013, 05:33 PM ISTखडसेंनी हाणला राज ठाकरेंना जोरदार टोला!
राज ठाकरेंनी नुसते आरोप करू नयेत, तर पुरावे द्यावेत अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पटलवार केलाय.
Mar 11, 2013, 05:31 PM ISTराज ठाकरे धोका आहे?
राज ठाकरे. राजकीय परखड आणि स्पष्ट वक्ता. युवकांचा आयकॉन. ज्यांच्या बोलण्यानंतर तसचं इशाऱ्यानंतर महाराष्ट्र नव्हे तर देश पुरता ढवळून निघतो. असं एक वादळी व्यक्तिमत्व. बरोबर सात वर्षांपूर्वी नऊ मार्चला महाराष्ट्राच्या राजकारणात ‘तुफान’ आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनी झाली. आज महाराष्ट्रात एक राजकीय नजर टाकली तर मनसे ‘राज’ दिसून येत आहे. या मागचं काय आहे गुपित? हे कसं काय शक्य झालं?, असे अनेक प्रश्न उभे राहतात.
Mar 11, 2013, 08:28 AM ISTखडसे मनसे आमदारांना बोलूच देत नाहीत- राज ठाकरे
विधीमंडळ अधिवेशनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलवली. या परिषदेत युपीएससी परीक्षांमधून प्रादेशिक भाषांची झालेली हद्दपारी या विषयावर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
Mar 10, 2013, 06:14 PM ISTमनसे अधिक आक्रमक होणार, राज बैठकीत निर्णय
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये राज्यात विरोधी पक्ष दिसत नाही, अशी सातत्याने टीका केली. यावर उत्तर मनसेने शोधून काढण्याचा ठरवलंय. कृष्णकुंजवर मनसे आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अधिक आक्रमक होण्याचा निर्णय झाल्याचे समजते. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची व्युहरचना करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येत आहे.
Mar 10, 2013, 02:41 PM ISTराज ठाकरें विचारतात, कुठे गेला राम?
मनसेच्या सातव्या वर्धापनदिनी मनसेचे मुंबईतील सगळे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी आज षण्मुखानंद सभागृहात उपस्थित असताना घाटकोपरचे आमदार राम कदम यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली.
Mar 9, 2013, 11:10 PM ISTगर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही - उद्धव
मी देखील लहानपणापासून गर्दी पाहत आलोय, त्यामुळे अशी गर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही.. गर्दी होते पण त्याचं मतामध्ये कुठं रुपांतर होतयं?
Mar 9, 2013, 06:54 PM IST....ही हिंमत येते ती फक्त तुमच्यामुळे - राज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे वर्धापनदिनानिमित्त त्यांची भुमिका स्पष्ट केली. पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरेंना काय वाटतं याबाबत त्यांचे मतही जाहीर केले.
Mar 9, 2013, 04:59 PM ISTमला टाळी आली, मी टाटा केला – राज ठाकरे
महाराष्ट्रात स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार. ही सत्ता मी आणणार म्हणजे आणणारच, असा ठाम विश्वास अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला. त्याचवेळी शिवसेनेला जोरदार टोला हाणला. काल सकाळी वर्तमानपत्रातून पुन्हा एक `टाळी` आली, मग मी दुपारी `टाटा` केला.
Mar 9, 2013, 03:43 PM IST`मतदार यादीतून ८५ टक्के मराठी नावं गायब`
मुंबईच्या मतदारयादीत गोंधळ असल्याचा आरोप, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ते षण्मुखानंद सभागृहात बोलत होते.
Mar 9, 2013, 01:58 PM ISTस्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणणारच - राज
महाराष्ट्रात स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार. ही सत्ता मी आणणार म्हणजे आणणारच, असा ठाम विश्वास अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
Mar 9, 2013, 01:34 PM IST‘षण्मुखानंदा’त रंगणार मनसेचा वर्धापन दिन सोहळा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज सातवा वर्धापन दिन आहे. राज्यातला दुष्काळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेला त्यांचा वाद, तसेच सेना-भाजप-मनसे अशा विशाल युतीची चर्चा या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या वर्धापनदिनाला मोठं महत्व प्राप्त झालंय.
Mar 9, 2013, 09:56 AM ISTरतन टाटांची राज ठाकरेंना खास भेटवस्तू
टाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा यांनी कृष्णकुंजवर राज यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी टाटा यांचं स्वागत केलं. टाटा यांनी राज यांची सदिच्छा भेट घेतली.
Mar 8, 2013, 11:17 PM ISTराज ठाकरेंच्या भेटीचे टाटांचे ‘राज’ काय ?
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ह्या घेतलेल्या भेटीमुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Mar 8, 2013, 05:28 PM IST