सहाव्या वन डेसाठी टीम इंडिया सज्ज!
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमधल्या वन डे सीरिजचा आज सहावी मॅच नागपूरमध्ये होणार आहे.सात सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ अशी आघाडी घेतलीय. चौथी आणि पाचवी वन-डे मॅच पावसामुळं रद्द झाल्यानं भारताला आता ही सीरिज जिंकण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळं ही मॅच म्हणजे टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती आहे.
Oct 30, 2013, 09:08 AM IST१९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा सचिनवर वर्षाव!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या १९९व्या टेस्टमॅचसाठी ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर उतरेल. यावेळी १९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सचिनवर केला जाणार आहे. एवढंच नाही तर १९९ फुगे सुद्धा आकाशात सोडले जातील. सचिन मुंबईत २००वी मॅच खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.
Oct 28, 2013, 09:33 AM ISTटी-२० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, पाकची गाठ भारतासोबत!
पुढील वर्षी बांगलादेश इथं होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसीनं वेळापत्रकाची घोषणा केली आहे. १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या २२ दिवसांच्या टी-२० चॅम्पियनशीपमध्ये टीम इंडियाची ओपनिंग मॅच असणार आहे ती पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी.
Oct 27, 2013, 04:20 PM ISTअखेरच्या रणजीसाठी सचिन सज्ज, सर्वांच्या नजरा सचिनवर!
लाहलीत मुंबई विरुद्ध हरयाणा रणजी मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकलाय. टॉस जिंकत मुंबईचा कॅप्टन झहीर खाननं पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे सचिनची ही शेवटची रणजी मॅच आहे. शेवटच्या वेळी रणजीचं मैदान गाजवण्यासाठी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर सज्ज आहे.
Oct 27, 2013, 11:03 AM ISTरांचीमध्ये धोनीच्या घरावर दगडफेक!
टीम इंडियाचा कप्तान याच्या होमटाऊनवर असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या वन-डेवर पावसानं पाणी फिरवलं. पावसामुळं मॅच रद्द झाल्यानंतर धोनीच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केला गेलाय. या दगडफेकीत धोनीच्या घराचे काच फुटल्याची माहिती मिळतेय. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यावेळी धोनीच्या कुटुंबातलं कोणीही घरी उपस्थित नव्हतं.
Oct 24, 2013, 10:50 AM ISTसचिनच्या आईसाठी वानखेडेवर विशेष रॅम्प!
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टसाठी वानखेडेवर जोरदार तयारी सुरु आहे. सचिनची आई त्याची अखेरची टेस्ट पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित असणार आहे.
Oct 22, 2013, 11:55 AM IST… आणि कॅप्टन कूल बॉलर्सवर भडकतो तेव्हा!
कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सध्या चांगलाच चिडलेला बघायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी बॉलिंग करायची, हे अनुभवी गोलंदाजांना कळायला हवं. मी त्यांना बोट धरून चालायला शिकवू शकत नाही, असा संताप व्यक्त करत त्यानं मोहालीत `माती खाणाऱ्या` ईशांत शर्माला सुनावलंय.
Oct 20, 2013, 01:41 PM ISTपराजयाचे मानकरी बॅट्समनच – धोनी
ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या वनडे मॅचमधील टीम इंडियाच्या पराजयला बॅट्समनच जबाबदार असल्याचं कॅप्टन कूल धोनीनं म्हटलंय. मैदानात जम बसल्यानंतर शॉट्सची निवड करतांना बॅट्समननं सावधगिरी बाळगायला हवी होती, असंही धोनी म्हणाला.
Oct 14, 2013, 04:05 PM ISTचॅम्पियन्स लीग: चेन्नई सुपरकिंग्ननं टायटन्सला ४ विकेटनं हरवलं
चॅम्पियन्स लीगमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं विजयी सलामी दिलीय. चेन्नईनं पहिल्या सामन्यात टायटन्सचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात टायटन्स टीमनं चेन्नईसमोर विजयासाठी १८६ रन्सचं आव्हान ठेवलं होतं.
Sep 23, 2013, 08:55 AM ISTइतर मॅचचीही चाचपणी करा - ललित मोदी
दिल्ली पोलिसांनी IPLमधल्या स्पॉट फिक्सिंगचा गौप्यस्फोट करताना तीन सामन्यांचे पुरावे दिले आहेत. मात्र खेळाडू आणि बुकींनी वापरलेली पद्धत बघता अन्य सामन्यांचीही चाचपणी केली जावी.
May 17, 2013, 10:58 AM ISTपाकशी मॅच, आम्ही तयार आहोत- धोनी
बीसीसीआयने पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेला ग्रीन सिग्नल दाखवल्यानंतर हिंदुस्थानातील कानाकोपर्यात नाराजीचे सूर उमटले असतानाच हिंदुस्थान क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
Jul 18, 2012, 10:50 AM ISTलहानग्या मुशीरचा रेकॉर्ड...
गाईल्स शिल्डमध्ये सर्वात लहान क्रिकेटपटू म्हणून पदार्पण केलेल्या साडेसहा वर्षांच्या मुशीर खानने पहिल्याच मॅचमध्ये कमाल केली आहे. पहिल्याच मॅचमध्ये मुशिरने ८ ओव्हर्समध्ये १.४ च्या इकॉनॉमीने ११ रन्स देत ६ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये त्याने ५ ओव्हर्स या मेडन टाकल्या.
Dec 14, 2011, 10:18 AM IST