१९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा सचिनवर वर्षाव!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या १९९व्या टेस्टमॅचसाठी ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर उतरेल. यावेळी १९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सचिनवर केला जाणार आहे. एवढंच नाही तर १९९ फुगे सुद्धा आकाशात सोडले जातील. सचिन मुंबईत २००वी मॅच खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 28, 2013, 09:33 AM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, कोलकाता
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या १९९व्या टेस्टमॅचसाठी ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर उतरेल. यावेळी १९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सचिनवर केला जाणार आहे. एवढंच नाही तर १९९ फुगे सुद्धा आकाशात सोडले जातील. सचिन मुंबईत २००वी मॅच खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्याआधी १९९वी मॅच म्हणजे सचिनची ईडन गार्डनवरची अखेरची मॅच. या मॅचच्या तयारीसाठी पश्चिम बंगालमध्ये जय्यत तयारी करण्यात आलीय.
सचिन ६ ते १० नोव्हेंबर दरम्यान कोलकातात १९९वी टेस्ट मॅच खेळेल. तर मुंबईत वेस्ट इंडिज विरुद्ध १४ नोव्हेंबरला सचिन आपल्या कारकीर्दीची अखेरची मॅच खेळणार आहे. सचिनच्या करिअरची ही २००वी टेस्ट मॅच आहे.
बंगाल क्रिकेट संघानं या महान क्रिकेटपटूला निरोप देण्याची पूर्ण तयारी केलीय. याअंतर्गतच टेस्ट मॅच बघायला येणाऱ्या जवळपास ६५ हजार प्रेक्षकांना सचिनचं मास्क आणि प्लेकार्ड दिलं जाणार आहे. सीएबीचे कोषाध्यक्ष विश्वरुप डे म्हणाले की, सचिनची ईडन गार्डनवरची अखेरची मॅच बघण्यासाठी ६५ हजार प्रेक्षक येण्याची शक्यता आहे. टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी सचिनचा मास्क दिला जाईल. तर दुसऱ्या दिवशी सचिनच्या सन्मानार्थ लिहीलेलं प्लेकार्ड दिलं जाईल.
तिसऱ्या दिवशी जेव्हा सचिन स्टेडिअमवर उतरेल तेव्हा १९९ फुगे आकाशात सोडले जातील. या फुग्यांवर सचिनचा फोटो आणि स्लोगन लिहीलेलं असेल.
चौथ्या दिवशी सचिनला समर्पित प्रसिद्ध व्यक्तींनी लिहीलेल्या लेखांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं जाईल. तर पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सचिनवर गुलाबाच्या फुलांच्या १९९ किलो पाकळ्यांची त्याच्यावर उधळण केली जाईल. हे कार्य हेलिकॉप्टर द्वारे केलं जाणार आहे. हे हेलिकॉप्टर क्रिकेट संघानं भाडेतत्त्वावर घेतलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.