इतर मॅचचीही चाचपणी करा - ललित मोदी

दिल्ली पोलिसांनी IPLमधल्या स्पॉट फिक्सिंगचा गौप्यस्फोट करताना तीन सामन्यांचे पुरावे दिले आहेत. मात्र खेळाडू आणि बुकींनी वापरलेली पद्धत बघता अन्य सामन्यांचीही चाचपणी केली जावी.

Updated: May 17, 2013, 11:02 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
दिल्ली पोलिसांनी IPLमधल्या स्पॉट फिक्सिंगचा गौप्यस्फोट करताना तीन सामन्यांचे पुरावे दिले आहेत. मात्र खेळाडू आणि बुकींनी वापरलेली पद्धत बघता अन्य सामन्यांचीही चाचपणी केली जावी, असं आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आयसीसी आणि बीसीसीआय गाफील राहिल्याचा आरोप त्यांनी केला.
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अटक करण्यात आली. फास्ट बॉलर श्रीसंत याला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तर त्याचसोबत राजस्थान रॉयलच्या अंकीत चव्हाण आणि अजित चंडालिया या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
या तिघांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकानं अटक केलीये. या तिघा खेळांडूंव्यतिरीक्त सात बुकिंना अटक करण्यात आलीये. तर अन्य दोन बुकी फरार झाले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.