मुसळधार पाऊस

येत्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ७२ तासांत मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 18, 2017, 10:47 AM IST

अहमदनगर जिल्ह्यातील राहातामध्ये मुसळधार पाऊस

जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे काही शेतांमध्ये ओढ्याचं पाणी घुसलं असून सोयाबिन, मका ही पिकं पाण्याखाली गेली आहेत.

Sep 18, 2017, 09:11 AM IST

कोल्हापुरात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस

कोल्हापूर शहरात बुधवारी विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला. एका रात्रीत या शहरात उच्चांकी 80 मिलिमीटर पाऊस झाला. 

Sep 14, 2017, 11:00 AM IST

रत्नागिरी, चिपळूणला पावसाने झोडपले

रत्नागिरी, चिपळूण आणि खेडला पावसानं झोडपलंय. सतत कोसळणा-या पावसामुळे चिपळून बाजारपेठेत पाणी घुसलंय. त्यामुळे व्यापा-यांची पुरती धावपळ उडालीय. 

Sep 10, 2017, 10:19 PM IST

शहापूर तालुक्यातल्या ५० गावांचा संपर्क तुटला

शहापूर तालुक्यात सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातसई गावाजवळील पूल खचलाय. त्यामुळे प्रशासनाने हा पूल दळणवळणासाठी बंद केलाय. त्यामुळे आता वासिंद परिसरतील ५० गावांचा संपर्क तुटला आहे.

Sep 1, 2017, 04:26 PM IST