रत्नागिरी, चिपळूणला पावसाने झोडपले

रत्नागिरी, चिपळूण आणि खेडला पावसानं झोडपलंय. सतत कोसळणा-या पावसामुळे चिपळून बाजारपेठेत पाणी घुसलंय. त्यामुळे व्यापा-यांची पुरती धावपळ उडालीय. 

Updated: Sep 10, 2017, 10:19 PM IST
रत्नागिरी, चिपळूणला पावसाने झोडपले title=

रत्नागिरी : रत्नागिरी, चिपळूण आणि खेडला पावसानं झोडपलंय. सतत कोसळणा-या पावसामुळे चिपळून बाजारपेठेत पाणी घुसलंय. त्यामुळे व्यापा-यांची पुरती धावपळ उडालीय. 

तर वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यात झाडं पडलीत. इंदापूर ते महाड मार्गावर ट्रॅफिक जाम लागला असून 4 ते 5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्यात. 

रायगडात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. रोहा परिसरात 15 किलोमीटरपर्यंत दाट ढगांचा थर आहे. त्यामुळे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.