येत्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ७२ तासांत मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Updated: Sep 18, 2017, 10:47 AM IST
येत्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज title=

मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ७२ तासांत मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी दुपारी मुंबई व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तापमानात घट झाली. त्यामुळे नवरात्रीत पाऊस हजेरी लावणार, अशी चिन्हे आहेत.

येत्या ७२ तासांत उत्तर कोकणासह मुंबईत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. सध्या राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर जोर कायम आहे.

मुंबई व परिसरात मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेऊन मुंबई महापालिकेचा आपत्कालीन विभाग सज्ज झाला आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेली मुसळधार पर्जन्यवृष्टीने मुंबई जलमय झाली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालिकेचा आपत्कालीन विभाग तयारीत आहे.