मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी असा असणार मेगाब्लॉक
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक.
Aug 10, 2019, 02:26 PM ISTहार्बर मार्गावर लोकलवर दगडफेक, पोलीस कर्मचारी जखमी
बेलापूर-सीएसटी लोकलवर वाशी - मानखुर्द स्थानकादरम्यान अज्ञाताने दगडफेक केली.
Jul 26, 2019, 09:22 PM ISTठाणे । मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, विठ्ठलवाडी येथे पेंटाग्राम तुटला
मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. विठ्ठलवाडी येथे पेंटाग्राम तुटल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्यात. त्यांना कल्याण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.
Jul 17, 2019, 12:30 PM ISTपेंटाग्राफ तुटून दोन महिला जखमी, मध्य रेल्वे विस्कळीत
मध्य रेल्वेचा पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. विठ्ठलवाडी दरम्यान पेंटाग्राफचे तुकडे उडालेत.
Jul 17, 2019, 09:09 AM ISTExclusive : मुंबईत मोबाईल चोराला पकडताना लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
लोकलमध्ये मोबाईल चोरट्याने लंपास केला. चोराचा पाठलाग करताना..
Jul 9, 2019, 10:17 AM ISTमुंबई । लोकलमध्ये मोबाईल चोरी, चोराला पकताना पडून प्रवाशाचा मृत्यू
मुंबईत रविवारी सात च्या सुमारास चर्णी रोड स्थानकात घडलेली घटना.शकील शेख या प्रवाश्याचा चोरट्याने मोबाइल हिसकावून धावत्या लोकल मधून फलाटावर उतरून पळ काढला.शकील यांनी लोकल मधून उतरून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत लोकल ने वेग पकडला होता वेगाचा अंदाज न आल्याने फलाट आणि लोकल च्या मध्ये पडून शकील शेख यांचा मृत्यू झाला.
Jul 9, 2019, 09:50 AM ISTमुलुंड येथे ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले, लोकल उशिराने
मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात आज सकाळी ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
Jul 6, 2019, 11:24 AM ISTमुंबई । कल्याण आणि डोंबवली रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी
कल्याण आणि डोंबवली रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. आज मध्य रेल्वेच्या केवळ ६०० फेऱ्या होणार आहेत. दररोज मध्य रेल्वेच्या सुमारे १७०० फेऱ्या होतात मात्र, आज रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. त्यातच लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे गर्दीच्यावेळी प्रवाशांना प्रवास करताना नाकीनऊ येत आहेत. काहीजण फलाटावर गर्दी असल्याने सरळ ट्रकवर उतरुन दुसऱ्या बाजुने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे.
Jul 3, 2019, 03:45 PM ISTमध्य रेल्वे प्रवाशांना मनस्ताप आणि प्रचंड गर्दीचा सामना
मध्य रेल्वेच्या आज रविवारच्या वेळापत्रकामुळे प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.
Jul 3, 2019, 03:21 PM ISTमध्य रेल्वेचा वेग अजूनही मंदावलेलाच, लोकल फेऱ्या कमी केल्याने प्रचंड गर्दी
मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.
Jul 3, 2019, 12:47 PM ISTमुंबईत लोकलमध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो सावधान !
लोकलमध्ये दरवाजात उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो काळजी घ्या.
Jun 27, 2019, 02:11 PM ISTपेंटाग्राफवर पत्रा पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत, जलद मार्गावर धीम्या गाड्या
ठाणे आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्ये रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली.
Jun 14, 2019, 05:46 PM ISTपश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या तिकिट दरात वाढ
पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या तिकिट दरात १ जूनपासून वाढ करण्यात येणार आहे.
May 30, 2019, 11:41 PM ISTमुंबई । मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळाला तडा
मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी विस्कळीत झाली. या मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी अप गाड्यांची वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू असल्याचे प्रवाशांचे हाल होत आहेत. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने या मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. दरम्यान, दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने पूर्ण केले तरी वाहतूक उशिरानेच सुरू राहणार आहे. सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा ताण जलद लोकलवर पडला आहे.
May 13, 2019, 12:10 PM IST