मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवार आणि रविवारी रात्री ब्लॉक घेण्यात आला आहे. माटुंगा ते कुर्ला दरम्यान अप आणि डाउन धिम्या-जलद मार्गावर रात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यत गर्डरचे काम करण्यात येणार आहे.परिणामी डाउन मार्गावरील रात्री 12.18 आणि 12.31 ची सीएसएमटी ते ठाणे-कुर्ला लोकल, अप मार्गावरील कुर्ला ते सीएसएमटी प.5.54 ची लोकल रद्द करण्यात आलेली आहे. शनिवारी रात्री 11.12 ची कल्याण-सीएसएमटी लोकल कुर्ला स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहे. तर अंबरनाथ-सीएसएमटी रा.10.01 ची लोकल ठाणे स्थानकापर्यत धावणार आहे.
51034 साईनगर शिर्डी-सीएसएमटी, 51208 पंढरपूर-सीएसएंमटी, 12134 मॅगलोर-सीएसएमटी एक्स्प्रेस रविवारी आणि सोमवारी दादर स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहेत. 11028 चैन्नई-सीएसएमटी मुंबई मेल, 11020 भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, 11058 अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, 16382 कन्याकुमारी-सीएसएमटी एक्सप्रेस, 12702 हैद्राबाद-सीएसएमटी हुसेनसागर एक्सप्रे, 11140 गडग-सीएसएमटी एक्स्प्रेस, 12810 हावडा-मुंबई मेल व्हाया नागपूर, 11402 नागपूर-सीएसएमटी नंदिग्राम एक्स्प्रेस या गाड्यांना रविवार आणि सोमवारी लेटमार्क बसणार आहे.
आसनगाव ते कसारा दरम्यान ओव्हरहेड वायरचे जाळे आणि पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याकरिता रविवारी सकाळी 10.50 ते दु.12.50 वाजेपर्यंत अप-डाउन मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान आसनगाव ते कसारा दरम्यानची अप-डाउन मार्गावरील लोकल वाहतूक बंद असणार आहे. सीएसएमटी-कसारा स.9.41,स.10.16ची लोकल आसनगाव पर्यतच धावणार आहे. कसारा-सीएसएमटी स.11.12,दु 12.19 च्या लोकल आसनगाव स्थानकातुन अनुक्रमे स.11.49,दु.12.56 वाजता चालविण्यात येणार आहेत. रविवारी 51153-54 मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर, 12117-18 एलटीटी-मनमाड-एलटीटी गोदावरी एक्सप्रेस रद्द केलेल्या आहेत. 11026 पुणे-भुसावळ एक्सप्रेस दौण्ड-मनमाड मार्गे धावणार आहे.
तसेच मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातील प्लॅटफॉर्म 1 वरील झाड तोडण्यासाठी रविवारी स.10.40 ते दु.1.40 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान ठाणे-कर्जत स.10.48,दु.12.05,कर्जत-ठाणे दु.1.27 अणि कर्जत-सीएसएमटी दु.1.57 ची लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत. सीएसएमटी-कर्जत स.9.01,स.9.38,स.10.36,स.11.15 ची लोकल भिवपुरी स्थानकापर्यतच धावणार आहेत. तसेच कर्जत-सीएसएमटी स.10.45,स.11.19,दु.12.21,दु 1 वाजताच्या लोकल भिवपुरी स्थानकातून अनुक्रमे स.10.54,स.11.28,दु.12.30,दु.1.09 वाजता चालविण्यात येणार आहेत.
तसेच उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवारी 17 मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र हा ब्लॉक मेन लाईनवर घेण्यात येणार नाही. हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी दरम्यान अप-डाउन मार्गावर स.11.10ते दु.3.40 वाजेपर्यत ब्लॉक चालणार आहे . प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पनवेल-वाशी,कुर्ला-सीएसएमटी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.
तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप-डाउन धिम्या मार्गावर स.10.35 ते दु.3.35 वाजेपर्यत जम्बोब्लॉक घेणार आहेत. या ब्लॉकदरम्यान धिम्या मार्गावरील वाहतुक जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे . परिणामी अप-डाउन मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आले आहेत.