मुंबई लोकल

मध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीनं सुरु

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते दिवा दरम्यान सुरू असलेला मेगाब्लॉक अखेर हटवण्यात आलाय. त्यामुळं फास्ट ट्रॅकवरून लोकल सोडण्यात आल्या आहेत. ठाणे ते कळवा दरम्यान पारसिक बोगद्याजवळील संरक्षण भिंतीला तडे गेल्यामुळं रेल्वे प्रशासनानं ती पूर्णपणे हटवली आहे. हे काम सुरू असल्यामुळं काही तास मध्ये रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. तर फास्ट ट्रकवरील वाहतूक पूर्णपणे बंद कऱण्यात आली होती. त्यामुळं मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. 

Jun 21, 2016, 06:30 PM IST

रेल्वे सेवा खंडीत, भांडूप स्टेशनवर महिलेची प्रसूती

मध्य रेल्वेच्या खोळंब्याचा परिणाम प्रवाशांसह सर्वसामान्यांना बसला. भांडूप स्टेशन एका महिलेची प्रसूती झाली. या महिलेची प्रसूती स्थानकावरील महिलांनीच केली.

Jun 21, 2016, 03:03 PM IST

संरक्षक भिंत कोसळली, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प

संरक्षक भिंत पडल्याने ठाणे रेल्वे स्थानकावर जलद मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे ३ आणि ४ फ्लॅटफॉर्मवरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंदच आहे. त्यामुळे आधीच उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे अधिक हाल झालेत.

Jun 21, 2016, 12:32 PM IST

Video : विक्रोळी स्टेशनवर लोकल व्यक्तीच्या अंगावरुन गेली

एक धक्कादायक व्हिडिओ. हा व्हिडिओ आहे एका आत्महत्येचा. मुंबईत विक्रोळी रेल्वे स्टेशनवर लोकल प्लॅटफॉर्मवर येत असताना एक व्यक्ती अचानक लोकल ट्रेनसमोर येऊन थांबली. आणि ही लोकल त्याच्या अंगावरून गेली.

Jun 21, 2016, 10:07 AM IST

मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे विस्कळीत

रात्रभरात झालेल्या मुसळधार पावसानं आजच्या दिवसाची सुरूवात मात्र लेटमार्कनं झालीय. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक किमान ३० उशिरानं सुरू आहे.

Jun 21, 2016, 08:10 AM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेवर आज अक्षरशः दुहेरी संकट ओढावलं. संध्याकाळी सायनजवळ लोकलगाडीचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती दुरूस्त होऊन गाड्या सुरू होतात तोच विक्रोळीजवळ ओव्हर हेड वायर तुटली आहे. त्यामुळे संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे.

May 25, 2016, 10:12 PM IST

मुंबई लोकलमध्ये खतरनाक स्टंट, पाहा व्हिडिओ

 मुंबई लोकलमध्ये गर्दीच्यावेळी लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात तर काही जण जीवावर उदार होऊ प्रवास करतात. असा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. 

May 25, 2016, 08:12 PM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रखडल्यात

जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे शनिवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प पडली आहे.

May 14, 2016, 12:12 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Apr 14, 2016, 10:43 AM IST