लोकलसमोर उडी मारुन तरुणाची आत्महत्या

ही दृश्य पाहून अंगाचा थरकाप उडू शकतो. हा आहे विडिओ मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवरच्या भाईंदर स्थानकातला आहे. 

Updated: Jul 16, 2016, 03:37 PM IST
लोकलसमोर उडी मारुन तरुणाची आत्महत्या title=

मुंबई : ही दृश्य पाहून अंगाचा थरकाप उडू शकतो. हा आहे विडिओ मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवरच्या भाईंदर स्थानकातला आहे. 

रविवार 10 जुलै रोजीचा संध्याकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमाराचा हा विडिओ आहे. यात महिला डब्याकडे एक तरुण उभा असलेला दिसतोय. त्याच्या देहबोलीवरुन तो अस्वस्थ असल्याचं जाणवतंय.

इतक्यात स्थानकात रेल्वे वेगात येते. आणि रेल्वे अक्षरशः जेमतेम दोन फूट अंतरावर आली असतानाच, हा तरुण स्वतः रेल्वे ट्रॅकवर झोकून देतो. कोणाला काही कळायच्या आतच हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे सारेच अवाक झाले.