मुंबई : लोकल प्रवास करणा-या मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव आहे.
पश्चिम रेल्वेने भाडेवाढीसंदर्भातील हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय.. हा प्रस्ताव मान्य झाल्यास मासिक पास आणि तिकीटाच्या दरांमध्ये मोठी वाढ होणार असून त्याची झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षात पश्चिम रेल्वेला झालेला चौदाशे कोटींचा तोटा झाला होता.. तो भरून काढण्यासाठीच हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीच्या दरांमध्ये फारसा फरक पडणार नसला तरी उपनगरीय रेल्वे प्रवासाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या पासमध्ये 47 टक्के तर सेकंड क्लासच्या पासच्या दरांमध्ये 38 टक्के इतकी घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.