मुंबई पोलीस

आता चित्रपटांत असतील चांगले पोलीस!

हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये पोलिसांची छबी चुकीची रंगवली जात असल्याचं मुंबई पोलिसांचं मत बनलंय. ही बाब कलाकार-निर्माता-दिग्दर्शकांच्या कानावर घालण्यासाठी आज अंधेरीत एक बैठक झाली.

Nov 11, 2013, 09:33 PM IST

विनोद कांबळीला परदेशी महिलेने म्हटले `ब्लॅक इंडियन `

क्रिकेटपटू विनोद कांबळीला `ब्लॅक इंडियन ` म्हणून एका परदेशी महिलेने हिणवलं. बांद्रा येथे राहणाऱ्या विनोद कांबळीच्या सोसायटीमध्ये पार्किंगवरून या महिलेने वाद घातला.

Oct 25, 2013, 08:50 AM IST

पाकिस्तानी गायक अदनान सामीला देश सोडण्याचे आदेश

पाकिस्तानी गायक अदनान सामीला मुंबई पोलिसांनी मंगळवारी दणका दिला आहे. व्हिसाची मुदत संपूनही मुंबईत राहणाऱ्या सामीला३० दिवसांच्या आत देश सोडून देण्याचे आदेश दिले आहे.

Oct 15, 2013, 01:39 PM IST

माझा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही- रौफ

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप असलेले पाकिस्तानचे वादग्रस्त अम्पायर असद रौफ यांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईमध्ये येण्यास नकार दिला आहे. मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचं यावेळी रौफ यांनी म्हटलं आहे.

Sep 29, 2013, 05:16 PM IST

मुंबई गॅंग रेपमधील बेपत्ता आरोपी ठाण्यातील जेलमध्ये

मुंबईतील शक्तीमिल गॅंग रेपमधील बेपत्ता आरोपी ठाण्यामधील जेलमध्ये सापडला आहे. सामूहिक बलात्कारातील आरोपी बेपत्ता असल्याने त्याला न्यायालयापुढे हजर करता आले नव्हते. त्यामुळे पोलिसांवर नामुष्की ओढवली होती.

Sep 27, 2013, 09:20 AM IST

आरोपी होतात फरार, याला नेमकं कोण जबाबदार?

अफजल उस्मानी हा इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी नवी मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे आरोपींच्या बंदोबस्तासाठी पुरवत असलेला पोलीस ताफा हा कुचकामी ठरत असल्याचं चित्र या घटनेवरुन स्पष्ट झालय.

Sep 22, 2013, 10:23 PM IST

स्पॉट फिक्सिंग : आरोपपत्र दाखल, मयप्पनवर बेटींगचे आरोप

आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी मुंबई क्राईम ब्रान्चनं आरोपपत्र दाखल केलंय. ११ हजार ६०९ पानांचं हे आरोपपत्र आहे.

Sep 21, 2013, 08:48 PM IST

पोलिसांना चकवा देऊन ‘आयएम’चा दहशतवादी फरार

मुंबई सेशन्स कोर्टात आज एक धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा अफजल उस्मानी हा दहशतवादी फरार झालाय.

Sep 20, 2013, 06:18 PM IST

पाचही आरोपी सज्ञान- डॉ. सत्यपाल सिंग

महालक्ष्मीच्या शक्ती मिलमध्ये फोटोजर्नलिस्ट तरूणीवर बलात्कार करणारे सर्व आरोपी सज्ञान म्हणजे 18 वर्षांवरील असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी स्पष्ट केलंय.

Aug 26, 2013, 05:43 PM IST

मुंबई पोलिसांना ग्रासलंय नपुंसकत्वाच्या समस्येने

मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचा-यांची वैद्यकिय चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ४० टक्के पोलीसांना नपुंसकत्वाच्या समस्यांनी ग्रासल असल्याचं समोर आलंय.

Aug 13, 2013, 06:31 PM IST

एन्काउंटर प्रदीप शर्मा निर्दोष, १३ पोलीस दोषी

लखनभैय्या एन्काउंटरप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची निर्दोष सुटका कऱण्यात आली आहे. मात्र, १३ पोलिसांवर हत्येचा ठपका ठेवण्यात आलाय.

Jul 5, 2013, 02:31 PM IST

भाव एक रुपया! पाक, दुबईतील फोन्स बंद

सट्टेबाजीमुळे क्रिकेट विश्व ढवळून निघाले. दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी सट्टेबाजांना पकडण्यास व्युहरचना केली. काही हाती लागले तर काही भूमिगत झाले. त्यांचा कारनामा सुरूच होता. पाकिस्तान आणि दुबईमार्फत सट्टा लावला जात होता. मुंबईत पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या टीम काळबादी येथे फिल्डिंग लावली. मात्र, त्याने भाव एक रूपया, असे म्हणताच पाक, दुबईतील फोन क्षणात बंद झालेत.

Jun 12, 2013, 10:39 AM IST

IPL फिक्सिंग : पहिल्या फ्रेंचायझी मालकाला अटक होणार?

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्सचा सीईओ आणि बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन कोडाईकनालहून मदुराईला रवाना झालाय.

May 24, 2013, 03:46 PM IST

लाचखोर ३६ मुंबई पोलीस निलंबित, आयुक्तांचा अजब दावा

कुर्ला-नेहरूनगरच्या पोलीस लाचखोरी प्रकरणी आयुक्त सत्यपाल सिंग यांनी अजब तर्क लढवलाय. पोलिसांना लाच घेण्यास प्रवृत्त केल्याचं सिंग यांचं म्हणणं आहे. दरम्यान, लाचखोर ३६ मुंबई पोलिसांना निलंबित करण्यात आलंय.

Apr 11, 2013, 12:38 PM IST

नेटिझन्स, मुंबई पोलिसांची आता तुमच्यावर नजर!

फेसबुक, ट्विटर, गुगल टॉक यासारख्या सोशल मीडियांवर अमर्याद गप्पांचे फड रंगवणा-या नेटकरांनी आता सावध राहावं. कारण तुमच्या प्रत्येक कमेंटवर आता मुंबई पोलिसांची नजर राहणार आहे.

Mar 17, 2013, 07:12 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x