स्पॉट फिक्सिंग : आरोपपत्र दाखल, मयप्पनवर बेटींगचे आरोप

आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी मुंबई क्राईम ब्रान्चनं आरोपपत्र दाखल केलंय. ११ हजार ६०९ पानांचं हे आरोपपत्र आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 21, 2013, 08:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी मुंबई क्राईम ब्रान्चनं आरोपपत्र दाखल केलंय. ११ हजार ६०९ पानांचं हे आरोपपत्र आहे.
या आरोपपत्रात एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन आणि विंदू दारासिंग यांच्यासह अन्य २० जणांच्या नावांचा समावेस करण्यात आलाय तर पाकिस्तानी अम्पायर असद रौफ यांच्यासहीत अन्य १५ कथित सट्टेबाजांना फरार म्हणून घोषीत करण्यात आलंय. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.
मयप्पनवरही आरोप निश्चित करण्यात आलेत. यामध्ये मयप्पनवर स्पॉट फिक्सिंगचे नव्हे तर बेटींगचे आरोप लावण्यात आलेत. यावर बीसीसीआयच काय भूमिका घेते ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, गुरुनाथ मयप्पनप्रकरणी एन. श्रीनिवासन यांनी आपले हात झटकलेत. मे महिन्यात स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर श्रीनिवास यांना बीसीसीआय अध्यक्ष पदावरून हटण्यास भाग पाडलं गेलं होतं.

मयप्पनवर भारतीय दंड संविधानाच्या कलम ४६५ (खोटं बोलणं, ४६६ (न्यायालयाच्या दस्तावेज किंवा सार्वजनिक दस्तावेजांमध्ये छेडछाड करणं), ४६८ (फसवणूक करण्यासाठी खोटं बोलणं), ४७१ (खोट्या दस्तावेजांचा वापर करणे), ४९० (संविधानाचा भंग करणे), ४२० (फसवणूक करणं), २१२ (दोषींना शरण देणं), १२० बी (गुन्हेगारी कट रचणं) तसंच ३४ (सामान्य उद्देश) असे आरोप लावण्यात आलेत.

क्रिकेटमधील या फिक्सिंगचा पर्दाफाश झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.