एन्काउंटर प्रदीप शर्मा निर्दोष, १३ पोलीस दोषी

लखनभैय्या एन्काउंटरप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची निर्दोष सुटका कऱण्यात आली आहे. मात्र, १३ पोलिसांवर हत्येचा ठपका ठेवण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 5, 2013, 02:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लखनभैय्या एन्काउंटरप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची निर्दोष सुटका कऱण्यात आली आहे. मात्र, १३ पोलिसांवर सत्र न्यायालयाने हत्येचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यांनी न्यायालयाने दोषी ठरवलेय.
२००६मध्ये लखनभैयाचा एन्काऊंटर झाला होता. त्यानंतर याप्रकऱणी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह तेरा पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा ठपका ठेवण्यात आला होता. आजच्या निकालात प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर तर प्रदीप सूर्यवंशींसह इतर तेरा पोलीस अधिकाऱ्यांवर हत्येचा ठपका ठेवण्यात आलाय.
आज मुंबई सत्र न्यायालयाने आपला निकाल देताना प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली. तर इतर २१ जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. यात १३ पोलिसांचा समावेश आहे. रामनारायण ऊर्फ लखनभैय्या गुप्ताचा ११ नोव्हेंबर २००६ रोजी एन्काउंटर झाला होता. डी. एन. नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी हा एन्काउंटर केला होता.

लखनभैय्या वर्सोव्याला येणार असल्याची टीप मिळाल्यावर पोलिसांनी एन्काऊंटर केला, असा पोलिसांचा दावा होता; मात्र भैय्याचा भाऊ वकील रामप्रसाद गुप्ता यांनी हा दावा बोगस असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हे प्रकण न्याप्रविष्ट होते. या प्रकणाचा आज निकाल लागला. १३ जणांना दोषी ठरविण्यात आल्याने आता त्यांना काय शिक्षा होते याकडे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.