www.24taas.com, झी मीडिया,
अफजल उस्मानी हा इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी नवी मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे आरोपींच्या बंदोबस्तासाठी पुरवत असलेला पोलीस ताफा हा कुचकामी ठरत असल्याचं चित्र या घटनेवरुन स्पष्ट झालय. मात्र पोलिसांना गुंगारा देऊन आरोपीनी पळ काढल्याची ही काही पहिलीच घटना नाही तर गेल्या दहा महिन्यात सहा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याचं उघड झालंय.
अफझल उस्मानी या इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला आणि नवी मुंबई पोलिसांची झोपच उडाली..पोलीस त्याला न्यायालयात घेऊन आले होते. मात्र तो अचानक कसा काय गायब झाला हे कोणालाच कळलं नाही. मात्र ही काही पहिलीच घटना नाही. गेल्या दहा महिन्यात नवी मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सहा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सहापैकी तीन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी तीन आरोपी अजुनही फरारच आहेत. हे सर्व आरोपी तळोजा जेलमधले होते. या आरोपींना कोर्टात हजर केलं असता, किवा रुग्णालयात दाखल केलं असता, तिथून ते पळून गेले आहेत.याबाबत कारवाईचा बडगा उगारत निष्काळजी करणा-या पोलिसांवर फक्त निलंबनाची कारवाई झाली आहे.पण या घटना वारंवार का घडत आहेत,याबाबत नवी मुंबई पोलीस काहीच बोलण्यास तयार नाहीत.
१ डिसेबर २०१२,दरोडा आणि अपहरण प्रकरणातील आरोपी गणेश शिंदे रुग्णालयातून फरार
7 डिसेंबर 2012 दरोड्यातील आरोपी गुरुचरण चहल आणि सुमीत नरोल फरार
9 मार्च 2013 सिडकोच्या लिपिकाची हत्या करणारा आरोपी हनुमान उर्फ प्रेम पाटील पालिका रुग्णालयातून फरार
हे सर्व आरोपी कधी रुग्णालयातून तर कधी न्यायालयातून फरार होतात. चित्रपटांच्या कथानकाला शोभतील अशा या घटना..मात्र अशा घटना का घडतात त्याला जबाबदार कोण याचं उत्तर देण्याचं नैतिक बळ कोणालाचं नसल्याचही दिसून येतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.