www.24taas.com, मुंबई
फेसबुक, ट्विटर, गुगल टॉक यासारख्या सोशल मीडियांवर अमर्याद गप्पांचे फड रंगवणा-या नेटकरांनी आता सावध राहावं. कारण तुमच्या प्रत्येक कमेंटवर आता मुंबई पोलिसांची नजर राहणार आहे.
नेटिझन्सवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी खास सोशल मीडिया लॅब तयार केलीय. अभिनेता अभिषेक बच्चन यानं शनिवारी या लॅबचं उद्धघाटन केलं. सायबर विश्वातल्या प्रत्येक घडामोडींकडं लक्ष ठेवून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ही लॅब तयार करण्यात आलीय. यासाठी 20 पोलिसांना खास प्रशिक्षणही देण्यात आलंय.
अनेक दहशतवादी फोन टॅपिंगपासून वाचण्यासाठी इंटरनेट आणि सोशल साईट्सचा आधार घेतात. त्यांच्या हालचाली समजणे या लॅबमुळे शक्य होईल असा दावा मुंबई पोलिसांनी केलाय.