माळीण

माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 104, बचावकार्य सुरुच

माळीणमध्ये मृतांचा आकडा 104 वर पोहचलाय. माळीणमध्ये अजूनही बचावकार्य सुरुच आहे. पाऊस आणि चिखलानंतर आता इथं बचावकार्यात दुर्गंधीचा व्यत्यय येतोय.

Aug 3, 2014, 07:45 PM IST

आनंदाची बातमी!, 3 महिन्याचा रूद्र आईसह बचावला

माळीण गावात झालेल्या दुर्घटनेत प्रत्येक घरात मनुष्य हानी झालीय. मात्र लिंबे कुटुंबियांच्या घरात आश्चर्यकारकरित्या सगळे बचावले. विशेष घरातल्या एका तीन महिन्यांच्या बाळाने अक्षरशः काळावर मात केलीय.

Jul 31, 2014, 07:47 PM IST

कुटुंबात रडायलाही कुणी राहिलेलं नाही

पासून 60 किलोमीटरवर असलेल्या मालीण गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळलाय. डिंभे धरणाच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या आदिवासी महादेव कोळी समाजाचं हे माळीण गाव आहे. हा डोंगर त्यांना त्यांच्या घरादारातला वाटायचा.

Jul 31, 2014, 05:42 PM IST

UPDATE माळीण गाव : मृतांचा आकडा 60 वर, राज्यसरकारकडून मदत जाहीर

गावातलं मदतकार्य केवळ  45 टक्केच पूर्ण झालंय. त्यामुळं अडकलेल्यांना  बाहेर काढण्यासाठी अजून 48 तास लागणार असल्याची माहिती एनडीआरएफचे कमांडर  आलोक अवस्थी यांनी दिलीय. ढिगा-याखाली अडकलेले मृतदेह आता कुजू लागले आहेत. त्यामुळं एनडीआरएफसमोरचे आव्हान अधिकच बिकट होत चाललंय. 

Jul 31, 2014, 08:12 AM IST

राज्यात पावसाचा तडाखा, माळीण गावावर डोंगर कोसळून ६० घरे गाडली

राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा नाशिक, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव येथील माळीण गावावर अख्खा डोंगर कोसळल्याने ५० ते ६० घरे गाडली गेलीत. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. तर नाशिकमध्ये पाथर्डी येथे इमारतीचा एक भाग कोसळलाय. तर माळशेज घाट आणि कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.

Jul 30, 2014, 12:10 PM IST