माळीण: माळीणमध्ये मृतांचा आकडा 104 वर पोहचलाय. माळीणमध्ये अजूनही बचावकार्य सुरुच आहे. पाऊस आणि चिखलानंतर आता इथं बचावकार्यात दुर्गंधीचा व्यत्यय येतोय.
मातीच्या ढिगाऱ्याखालून मानवी मृतदेहांसोबतच जनावरांचे मृतदेहही काढले जात आहेत. त्यामुळं इथं दुर्गंधी पसरलीय. अशाही परिस्थितीत एनडीआरएफचं शोधकार्य सुरू आहे. रोगराई पसरु नये यासाठी विशेष उपाययोजना केल्याचं एनडीआरएफनं म्हटलंय.
स्थानिकांना योग्य उपचार दिले जात असून त्यांची योग्य काळजी घेतली जातेय असं एनडीआरएफनं म्हटलंय. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत राज्य सरकारनं जाहीर केलीय. तर जखमी झालेल्यांचा खर्च सरकार करणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.