पूनम राऊतचे शानदार अर्धशतक
भारताची सलामीवीर पूनम राऊतने इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्डकप फायनलमध्ये शानदार अर्धशतक झळकावलेय. तिने ७५ धावांत हे अर्धशतक झळकावलेय. तिचे वनडेमधील हे दहावे अर्धशतक आहे.
Jul 23, 2017, 08:50 PM ISTभारतासमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान ठेवलेय. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २२८ धावा केल्या.
Jul 23, 2017, 06:32 PM ISTमहिला क्रिकेटर्ससाठी अक्षयचा मेसेज
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल सुरु आहे. इतर क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारही या मॅचसाठी उत्सुक आहे.
Jul 23, 2017, 06:05 PM ISTफायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स
टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.
Jul 23, 2017, 03:56 PM ISTमहिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय
आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 23, 2017, 02:58 PM ISTमैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज
नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
Jul 23, 2017, 02:47 PM ISTटीम इंडियानं महिला टीमला फायनलसाठी दिल्या थेट श्रीलंकेतून शुभेच्छा
१४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे.
Jul 23, 2017, 09:40 AM ISTभारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट वर्ल्डकपचा आज महामुकाबला
आज भारतीय टीम १२ वर्षांनी महिला क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल खेळणार आहे. आणि तिही क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर. या मैदानावरच भारतानं पुरुषांचा वर्ल्ड कप 1983 साली जिंकला होता. आणि आता तसाचा इतिहास घडवण्याची संधी मिथाली राज अँड कंपनीकडे आहे.
Jul 23, 2017, 09:02 AM ISTहरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत, फायनलमध्ये खेळण्याबाबत साशंकता
आयसीसी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या फायनल सामन्यासाठी अवघे काही तास उरलेत. यातच टीम इंडियासाठी बॅड न्यूज आलीये.
Jul 22, 2017, 08:22 PM ISTजे पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करुन दाखवलं - सेहवाग
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाला भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने शुभेच्छा दिल्यात.
Jul 22, 2017, 07:56 PM ISTवर्ल्डकपमध्ये भारत विजयाचा प्रबळ दावेदार - गांगुली
भारतीय महिला संघ क्रिकेट वर्ल्डकप जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय. यावेळी गांगुलीने हरमनप्रीत कौरचेही कौतुक केले.
Jul 22, 2017, 06:06 PM ISTमिताली राजचा डान्सचा व्हिडीओ झाला व्हायरल
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध फायनल सामना खेळणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे प्रदर्शन चांगले होतेय.
Jul 22, 2017, 05:24 PM ISTकपिल देव, गांगुलीसाठी लकी ठरलेले लॉर्डसच्या मैदानावर मितालीची परीक्षा
लॉर्ड्सच्या मैदानावर रविवारी भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मजल मारलीये.
Jul 22, 2017, 03:59 PM ISTहरमनप्रीतच्या कामगिरीने कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 07:46 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर मिताली राजचे मोठे विधान
महिला क्रिकेट वर्ल्डकप २०१७च्या सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी नमवत फायनलमध्ये प्रवेश केलाय. फायनलमध्ये रविवारी भारत इंग्लंडशी भिडणार आहे.
Jul 21, 2017, 03:56 PM IST