वर्ल्डकपमध्ये भारत विजयाचा प्रबळ दावेदार - गांगुली

भारतीय  महिला संघ क्रिकेट वर्ल्डकप जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय. यावेळी गांगुलीने हरमनप्रीत कौरचेही कौतुक केले. 

Updated: Jul 22, 2017, 06:06 PM IST
वर्ल्डकपमध्ये भारत विजयाचा प्रबळ दावेदार - गांगुली title=

कोलकाता : भारतीय  महिला संघ क्रिकेट वर्ल्डकप जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय. यावेळी गांगुलीने हरमनप्रीत कौरचेही कौतुक केले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने ११५ धावांत १७१ धावा तडकावल्या. तिच्या खेळाबाबत गांगुली म्हणाला, मी तिचा खेळ पाहिला. चांगली फलंदाजी केली. भारत फायनलमध्ये इंग्लंडला हरवेल, असा विश्वासही गांगुलीने यावेळी व्यक्त केला. 

सौरव गांगुलीशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही हरमनप्रीत कौरला शुभेच्छा दिल्यात. प्रत्येक पंजाबवासियांना हरमनप्रीत कौरचा अभिमान आहे जिने आपल्या कठोर मेहनत तसेच समर्पणाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलीये. तिच्यामुळे अनेक मुलींना प्रेरणा मिळेल असेही ते म्हणाले.