फायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स

टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.

Updated: Jul 23, 2017, 03:56 PM IST
फायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स  title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.

धोनीने पुढे म्हटलं की, फायनल मॅचचा माझा अनुभव शेअर करतो की, रिझल्ट काय येईल याचा विचार न करता मैदानावर चांगला खेळ करा. कारण मॅचमध्ये चांगली बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग मॅचच्या रिझल्ट आणते. त्यामुळे चांगला खेळ दाखवा.

पाहा काय बोलला धोनी