ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर मिताली राजचे मोठे विधान

महिला क्रिकेट वर्ल्डकप २०१७च्या सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी नमवत फायनलमध्ये प्रवेश केलाय. फायनलमध्ये रविवारी भारत इंग्लंडशी भिडणार आहे. 

Updated: Jul 21, 2017, 03:56 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर मिताली राजचे मोठे विधान title=

डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकप २०१७च्या सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी नमवत फायनलमध्ये प्रवेश केलाय. फायनलमध्ये रविवारी भारत इंग्लंडशी भिडणार आहे. 

या सामन्यात हरमनप्रीत कौरचे धावांचे वादळ पाहायला मिळाले. तिने ११५ चेंडूत तब्बल १७१ धावा ठोकल्या. २० चौकार आणि ७ षटकार तिने तडकावले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताची कर्णधार मिताली राज उत्साहित दिसत होती. ती म्हणाली, हरमनप्रीत कौरची खेळी विशेष होती. सेमीफायनलमध्ये अशा प्रकारची खेळी करणे जबरदस्त आहे. झुलननेही चांगली कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणारे खेळाडू आमच्या संघात आहेत. स्मृतीने स्पर्धेच्या सुरुवातीला शतक ठोकले. त्यानंतर पूनम राऊतने आणि या सामन्यात हरमनप्रीतने. आम्ही सर्वच लॉर्ड्सच्या मैदानावर खेळण्यास उत्सुक आहोत. मला विश्वास आहे की हरमन फिट होईल आणि फायनलमध्ये खेळेल. 

फायनलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याबाबत बोलताना मिताली म्हणाली, इंग्लंडविरुद्धचा सामना महत्त्वाचा असेल. त्या दिवशी जो चांगला खेळ करेल त्याचा विजय होईल. आखलेली रणनीती मैदानात उतरवण्यावर आमचा भर असेल.