मिताली राजचा डान्सचा व्हिडीओ झाला व्हायरल

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध फायनल सामना खेळणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे प्रदर्शन चांगले होतेय. 

Updated: Jul 22, 2017, 05:24 PM IST
मिताली राजचा डान्सचा व्हिडीओ झाला व्हायरल title=

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध फायनल सामना खेळणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे प्रदर्शन चांगले होतेय. 

हरमनप्रीतच्या गोलंदाजीने सेहवागच्या खेळाची आठवण करुन दिली. यातच आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवरुन मिताली राज आणि वेदा कृष्णमूर्तीचा व्हिडीओ शेअर केलाय.

हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यानचा आहे. मिताली आणि स्मृती आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये बसले होते. यावेळी मिताली आणि वेदा डान्स करताना दिसली. 

मात्र जशी मितालीची नजर कॅमेराकडे गेली ती लाजली. आयसीसीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय, वेदा आणि मिताली या बॅटिंगमध्येच स्टार नाहीत तर डान्सिंगमध्येही त्यांनी आपलं स्किल दाखवलंय.