शेतकरी संपाला हिंसक वळण, एसटीची तोडफोड
शेतकऱ्यांच्या आजच्या महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिसंक वळण लागले. शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील ५ एसटी बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या.
Jun 5, 2017, 12:12 PM ISTशेतकरी आंदोलन पेटणार, पोलिसांचा लाठीचार्ज तर साताऱ्यात दगडफेक
नांदगाव - चाळीसगांव रास्त्यावर जळगाव खुर्द येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे शेतकरी संपप्त झालेत. पोलिसांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरु केला. याचे पडसात परिसरात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.
Jun 5, 2017, 10:43 AM ISTपुण्यातही शेतकऱ्यांच्या बंदला मोठा प्रतिसाद
पुण्यातही शेतक-यांच्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मार्केट यार्डमध्ये शेतमालाची आवक ७० टक्क्यांनी घटली आहे. फक्त तीस टक्के शेतमाल मार्केट यार्डात आला आहे. शेतकरी संपानंतर चौथ्या दिवशी भाजीपाल्याची आवक कमी होती. आज बंदाच्य़ा पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Jun 5, 2017, 10:04 AM ISTमहाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणतांब्यातही बंद
आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणतांब्यात बंद ठेवण्यात आला आहे. या बंदमध्ये शिवसेनाही सहभागी झाली आहे. रात्री नगर तालुक्यातल्या टाकली काजीमध्ये झालेल्या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे आणि पोलिसांची बाचाबाची झाली. त्या नंतर पोलिसांनी गाडे यांना अटक केली आहे.
Jun 5, 2017, 09:47 AM ISTअजित पवार यांची राज्य सरकारवर जोरदार टीका
राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सुरु केलेला संप हे सरकारचं इतिहासातलं मोठं अपयश असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Jun 5, 2017, 08:28 AM ISTशेतकरी संप : मुंबई बाजार समितीमध्ये ९९७ गाडयांची आवक
शेतकऱ्यांची महाराष्ट्र बंदची हाक आणि शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशी सुरु असल्याने सर्वसामान्यांचे हाल सुरु झालेत.
Jun 5, 2017, 08:09 AM ISTशेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरुच, महाराष्ट्र बंदला प्रतिसाद
शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरुच आहे. आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक गावांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय. काल नगर जिल्ह्यात संपाला पाठिंबा कायम ठेवत शेकडो लीटर दूध रस्त्यावर ओतलं. भाजीपालही फेकण्यात आला.
Jun 5, 2017, 07:55 AM ISTशेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबा
गेल्या चार दिवसांपासून शेतकरी संप सुरु आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेय. या बंदला खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला असताना आता शिवसेनेनेही आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.
Jun 4, 2017, 10:37 PM ISTशेतकरी संपाला राजू शेट्टींचा पाठिंबा, उद्या महाराष्ट्र बंद
शेतकरी संपात फूट पडली असली तरी काही शेतकऱ्यांना संप आज चौथ्या दिवशी सुरुच आहे. ५ जूनच्या महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा असून आम्ही संपात सहभागी होणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेय, असा थेट आरोप खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.
Jun 4, 2017, 06:19 PM ISTशेतकऱ्यांनो संयम बाळगा : दीपक केसरकर
शेतकऱ्यांनी केलेल्या संपानंतर अर्थराज्य मंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय.
Jun 2, 2017, 10:36 PM IST५ जूनपासून महाराष्ट्र बंदची हाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2017, 08:56 PM ISTशेतकरी संपाला राज ठाकरेंचा पाठिंबा, भाजप सरकारने बनवले!
शेतकरी संपाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला आहे. शेतकरी संपावरून राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची साफ निराशा करुन फसवणूक केल्याचे राज म्हणालेत.
Jun 2, 2017, 07:02 PM ISTशेतकरी संतापला, ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक
शेतीमालाला हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीबाबत सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी संपाचा लढा तिव्र करण्याचा इशारा दिलाय. ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक दिलेय.
Jun 2, 2017, 06:43 PM ISTगोविंद पानसरे हत्या : निषेधार्थ महाराष्ट्र बंद, राजकीय पक्षांचा पाठिंबा
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज डाव्या संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. कोल्हापुरात कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. डाव्यांनी पुकारलेल्या या बंदमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सामील होणार आहे.
Feb 22, 2015, 11:48 AM IST