शेतकरी संपाला राजू शेट्टींचा पाठिंबा, उद्या महाराष्ट्र बंद

शेतकरी संपात फूट पडली असली तरी काही शेतकऱ्यांना संप आज चौथ्या दिवशी सुरुच आहे. ५ जूनच्या महाराष्ट्र बंदला आमचा  पाठिंबा असून आम्ही संपात सहभागी होणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेय, असा थेट आरोप खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 4, 2017, 06:19 PM IST
शेतकरी संपाला राजू शेट्टींचा पाठिंबा, उद्या महाराष्ट्र बंद  title=
छाया सौजन्य : DNA

कोल्हापूर : शेतकरी संपात फूट पडली असली तरी काही शेतकऱ्यांना संप आज चौथ्या दिवशी सुरुच आहे. ५ जूनच्या महाराष्ट्र बंदला आमचा  पाठिंबा असून आम्ही संपात सहभागी होणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेय, असा थेट आरोप खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.

शेतकरी संपाला आता मोठी धार येण्याची शक्यता आहे. या संपात आता खासदार राजू शेट्टी उतरत आहे. मी सर्व संघटनांशी चर्चा करुन संप अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला कोल्हापुरात दिलाय. सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केलेय. जी कर्जमाफी करण्याबाबत घोषणा केलेय ती चुकीची आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला गेल्यांचा शेतीबाबत अभ्यास कमी आहे. मूळात शेतकरी मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक आहेत, हे पटत नाही. त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला आहे, असे शेट्टी म्हणालेत.

दरम्यान, नाशिकमधील शेतकरी संघटनेच्या बैठकीत पाच तारखेला महाराष्ट्र्र बंद बाबत ठराव करण्यात आला. सहा तारखेला मुंबईत कोअर कमिटीची बैठक होणार असून, ८ रोजी राज्यस्तरीय कृषी परिषद घेऊन सर्व राज्यस्तरीय नेते हजर राहतील, असे शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले.

संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतीमालाला हमी भाव आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलेली आश्वासने आपल्याला मान्य नसून आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

नाशिकमध्ये भाजीपाला, दुधाच्या गाड्या अडवून त्यांची नासधुस करणाऱ्या तब्बल १५० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांची धरपकड सुरु आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालकमंत्री गिरिष महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत.  

तर दुसरीकडे शिर्डीतील शेतकऱ्यांनी अहमदनगर-मनमाड महामार्ग अडवला. शेतकर्‍यांचं महामार्गावर प्रवरानगर फाटा येथे आंदोलन आणि रास्तारोको सुरु होता. फळे, भाजीपाला , दुध रस्त्यावर ओतून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

धुळ्यातील शेतकरी संपावर ठाम, सुरत-नागपूर महामार्गावरील लोणखेडी फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको केला. महामार्गावर अडवलेले दूध गरम करुन रास्ता रोकोत अडकलेल्या वाहन धारकांना वाटून आंदोलकांनी  शासनाचा निषेध केला.