Bhai Dooj 2024 Date : 3 की 4 नोव्हेंबर कधी आहे भाऊबीज? 'या' अशुभ योगात भाउरायाचं औक्षण करु नका, पाहा शुभ मुहूर्त

Bhai Dooj 2024 Shubh Muhurat : बलिप्रतिपदानंतर दिवाळीची सांगता होते ती भाऊ बहिणीच्या सणाने भाऊबीजने...यंदा लक्ष्मीपूजन दोन दिवस करण्यात आलं. तसंच अनेकांना संभ्रम आहे भाऊबीज नेमकी कधी आहे. 

Updated: Nov 2, 2024, 01:58 PM IST
Bhai Dooj 2024 Date : 3 की 4 नोव्हेंबर कधी आहे भाऊबीज? 'या' अशुभ योगात भाउरायाचं औक्षण करु नका, पाहा शुभ मुहूर्त  title=
Bhai Dooj 2024 Date Bhau Beej When is November 3 or 4 Bhai Dooj shubh muhurat tilak timing

Bhai Dooj 2024 Shubh Muhurat :  दिवाळीचा शेवटचा दिवस असतो तो भाऊ बहिणीचा. पंचांगानुसार कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीही यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे. यालाच भाऊबीज असंही म्हणतात. आख्यायिकेनुसार भाऊबीजेच्या दिवशी यम आपल्या बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास जातो म्हणून या दिवसाचं स्मरण म्हणून यमद्वितीया असं म्हटलं जातं. या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळक लावते आणि त्यांच्या दीर्घायुष्याची आणि आनंदी आयुष्याची कामना करते. 

यंदा दिवाळी लक्ष्मीपूजन दोन दिवस आल्यामुळे भाऊबीजे सणाबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. अशात भाऊबीज कधी आहे, कुठल्या शुभ मुहूर्तावर बहिणीने भावाला औक्षण केलं पाहिजे जाणून घ्या. 

3 की 4 नोव्हेंबर कधी आहे भाऊबीज? 

मराठी पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी 2 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8:22 वाजेपासून 3 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:06 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी करायची आहे. 

भाऊबीज सणावर अशुभ संयोग तयार आहोत असून राहुकाळाची अशुभ सावली असणार आहे. यादिवशी राहुकाळ संध्याकाळी 4.12 मिनिटांपासून 5.34 मिनिटांपर्यंत असणार आहे. राहुकाळ झाल्यानंतर भावाला टिळक लावावे. 

'ही' आहे लाडक्या भावाला ओवाळण्याची शुभ वेळ!

3 तारखेला सकाळी 11 वाजून 39 मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहिल. तर यानंतर शोभन योग असणार आहे. त्यामुळे भाऊरायाला ओवाळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ ही सकाळी 11 वाजून 45 मिनिटांपर्यंत असेल.  

3 शुभ मुहूर्ताला भावाला लावा टिळक

पहिला मुहूर्त -  काळी 07 वाजून 57 मिनिटांपासून ते 09 वाजून 19 मिनिटांपर्यंत
दुसरा मुहूर्त - सकाळी 09.20 ते 10.41 या वेळेत
तिसरा शुभ मुहूर्त - सकाळी 10 वाजून 41 मिनिटांपासून दुपारी 12 वाजेपर्यंत 

बहिणींनी असा लावावा भावांना टिळा! 

भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी आकाशात चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीला ओवाळते. त्यानंतर ती भावाला पाटावर बसवते. तेथे ती दिवा, हळद-कुंकू, अक्षता याने सजवलेले ताट घेऊन प्रथम चंद्राला ओवाळते आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळते. त्यानंतर भाऊ बहिणीच्या ताटाक बहिणीला ओवाळणी देतो. या सणामुळे बहीण-आणि भावाचे नातं घट्ट होतं.

असं मानलं जातं की, भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या अनामिका (अंगठीचे बोट) बोटात अमृत तत्व असतं. त्यामुळे बहिणींनी उजव्या हाताच्या अनामिका बोटाने भावाला टिळा लावावा. याची विशेष काळजी घ्यावी. टीका करताना भावाने आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावा. यावेळी बहिणींनी भावासाठी मंगलकामना करावी. त्यानंतर भावाला टिळा लावावा आणि अक्षता लावाव्यात.

भगवान श्रीकृष्णाशीही एक कथा जोडली गेली आहे. या कथेनुसार भगवान श्रीकृष्ण नरकासुर राक्षसाचा पराभव करून आपली बहीण सुभद्रा यांना भेटायला गेले होते. बहीण-भावाच्या या भेटीनंतर हा दिवस पुढे भाऊबीज म्हणून साजरा करण्यात येतं आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)