मुंबई : शेतकरी संपाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला आहे. शेतकरी संपावरून राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची साफ निराशा करुन फसवणूक केल्याचे राज म्हणालेत.
सध्या योजनांना गोंडस नावं देऊन भाजप सरकार भुलवत आहे. शेतकऱ्यांच्या भावनेला माझा पाठिंबा आहे. मी शेतकऱ्यांसोबत कायमच आहे. मात्र, जे गिरणी कामगारांचे झालं ते शेतकऱ्याचे होऊ नये, असे राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.
सरकार आता म्हणतं, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहित नव्हतं का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थिक करुन शेतकऱ्यांचा राग मी समजू शकतो, मात्र जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्यांचं होऊ नये, असे ते म्हणालेत.
राज्यात मराठा आरक्षणासाठीही मोर्चे निघाले, पुढे काय झालं?, आपल्याकडे तोडगे निघत नाहीत. भाजप सरकार खोटे बोलून सत्तेवर आले आहे, जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्याचं होऊ नये, राज म्हणालेत.